Electricity Bill Increase Pudhari
गोवा

Electricity Bill Protest | हा वीज विभाग की वसुली विभाग ?

Electricity Bill Protest | अवाजवी वीजबिलांविरोधात हणजूणवासीयांचे विद्युत भवनसमोर आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

हणजूण येथील नागरिकांनी वाढीव वीजबिले आणि अतिरिक्त दंडाच्या विरोधात विद्युत भवनसमोर आंदोलन छेडले. यात आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक, उपाध्यक्ष मॅन्युअल कार्दोज, युवा आघाडीचे अध्यक्ष पूजन मालवणकर तसेच अल्पसंख्याक आघाडीचे नेते सर्फराज अंकलगी सहभागी झाले. यावेळी आपच्या नेत्यांनी वीज विभागाचे रूपांतर 'वसुली विभागात' झाल्याचा आरोप केला.

अनेक ग्राहकांना अचानक हजारो रुपयांची वीजबिले प्राप्त होत असून, मंजूर भार ओलांडल्याच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जात असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत नागरिकांना पूर्वसूचना दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

आप नेत्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर इंधन दरवाढ आणि महागाईमुळे सामान्यांवर आर्थिक भार टाकल्याचा आरोप केला. आप गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर अधिक आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याचा दावा करत त्यांनी प्रभावित ग्राहकांना तत्काळ दिलासा देण्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांनी वाढीव वीजबिले आणि अतिरिक्त दंड तत्काळ मागे घेण्याची तसेच वीज ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्याची मागणी केली.

...तर केवळ पेज जेवून राहावे लागेल !

हणजूण नागरिकांना या महिन्यात बिलासोबत अतिरिक्त भार वापरल्याबद्दल दंडही भरावा लागल्याने त्यांनी दंडमाफीची मागणी केली आहे. अशीच अमाप बिले येत राहिली तर पेज जेवून जगावे लागेल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. यावेळी अमित पालेकर, वाल्मिकी नाईक यांच्यासह नागरिकांनी पेज जेवून वाढीव वीजबिलांचा जाहीर निषेध केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT