Yoga Health Campaign Pudhari File Photo
गोवा

Yoga Health Campaign | आरती मुंडये यांचा योगातून शरीर संपदाचा प्रचार

Yoga Health Campaign | महिलांमध्ये जागृती : दुर्गामाता महिला मंडळाद्वारे सामाजिक कार्य

पुढारी वृत्तसेवा

आमच्या नवदुर्गा फोंडा : पुढारी वृत्तसेवा
शिक्षण हे प्रगतीचे एक महत्त्वाचे पाऊल असून, शिक्षणातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्याची संधी मिळते, असे सांगताना कुटुंब सांभाळताना आरोग्याकडेही लक्ष द्या, असे आवाहन दुर्गाभाट - फोडा येथील आरती दिनकर मुंडये करतात. विशेष म्हणजे योगातून शरीर संपदा राखण्यासाठी योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्या कार्यरत आहेत.

स्वतः उच्च पदावर काम करताना सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून महिलांना विविध क्षेत्रात मार्गदर्शन करणाऱ्या आरती मुंडये सध्या प्रदीर्घ सेवा दिलेल्या नोकरीतून निवृत्त झाल्या असल्या तरी सामाजिक देण्यात त्या भरभरून काम करताना दिसतात. सुरुवातीला बेतोडा आणि त्यानंतर मडकई औद्योगिक वसाहतीत बड्या कंपनीत 'एचआर' म्हणून त्यांनी काम केले आणि नियोजन वक्तशीरपणा व इतर बाबींवर भर दिला.

त्यांचे पती दिनकर मुंडये हे प्रसिद्ध व्यावसायिक असून, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. फोंडा पालिकेचे नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी उपनगराध्यक्ष पदही भूषवले आहे. पालिकेत विविध विकासात्मक कामे करताना त्यांनी लोकसंग्रह वाढवला. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करताना मुंडये पती पत्नीला ते उपयुक्त ठरले.

बऱ्याचदा घर सांभाळताना गृहिणी अर्थातच महिला वर्ग स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा महिलांना विविध आजार आणि व्याधींना विशेषतः ब्रेस्ट कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागते. महिलांना त्यादृष्टीने सजग करण्यासाठी आरती मुंडये यांनी काम केले आहे.

दुर्गाभाट व इतर परिसरात त्यांच्या दुर्गामाता महिला मंडळाच्या माध्यमातून प्रोग्रेसिव्ह फ्रंट या संस्थेच्या सहकार्याने अनेक आरोग्य शिबिरे घेतली. त्यातून लोकांना आरोग्याविषयक लाभ मिळवून देताना ब्रेस्ट कॅन्सर सारख्या व्याधीबाबत महिलांना माहिती देतात. रक्तदान शिबिरांचाही त्यात समावेश असून एकमेका साह्य करू... या उक्तीनुसार महिलात जनजागृती केली.

समाजकार्य कौतुकास्पद


नवरात्रोत्सव काळात तर अनेक कार्यक्रम हाती घेताना महिलांच्या कलागुणांना वाव करून देण्यासाठी त्या काम करतात. विशेष म्हणजे एक ना दोन कितीतरी उपक्रम आरती मुंडये साकारताना दिसतात.

समाज शिक्षित व्हावा, सुदृढ व्हावा हीच मनीषा बाळगून आरती मुंडये कुटुंबाच्या, महिला सहकाऱ्यांच्या साथीने कार्यरत आहेत. माणसाने नेहमी कार्यमग्न राहिले पाहिजे या विचारांच्या आरती मुंडये यांचे कार्य म्हणूनच कौतुकास्पद असेच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT