Goa AAP  
गोवा

Goa AAP | 'आप' सत्तेत आल्यास 10 लाखांचा आरोग्य विमा

Goa AAP | अरविंद केजरीवाल : फोंड्यात टाऊन हॉलमध्ये नागरिकांशी संवाद

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोव्यात 'आप'ला सत्तेत आणल्यास एका आठवड्यात नागरिकांसाठी १० लाख रुपयांची कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू केली जाईल. फोंड्यात येऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेने 'आप'चा आमदार निवडून द्यावा, असे वक्तव्य आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले.

फोंड्यात आयोजित केलेल्या टाऊनहॉलदरम्यान एका महिलेने अशा आरोग्य सुविधांचा आम्हाला फायदा कसा मिळेल, असे विचारल्यावर केजरीवाल यांनी प्रतिपादन केले. राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राज्य अध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि वरिष्ठ उपाध्यक्ष तेलेकर देसाई यांच्या उपस्थितीत फोंडा येथे आयोजित हेल्थकेअर टाऊनहॉलमध्ये सहभाग घेतला.

यावेळी त्यांनी गोव्यातील आरोग्यसेवेची सद्यस्थिती आणि ती सुधारण्यासाठी 'आप'ची योजना यावर चर्चा करण्यासाठी हा टाऊनहॉल आयोजित करण्यात आला होता. या टाऊनहॉल दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा पोटनिवडणूक फोंड्यातून 'आप'चा आमदार निवडून देण्याचे आवाहन करत, फोंड्यातील आयडी हॉस्पिटलचे संपूर्ण कायापालट करून दाखवण्याचे आश्वासन दिले.

पंजाबमध्ये 'आप' सरकारने लागू केलेल्या १० लाख रुपयांच्या कॅशलेस आरोग्य विमा योजनेची देशभरात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे गोमंतकीयांमध्येही या आरोग्य विमा मॉडेलबाबत उत्सुकता वाढली आहे ते पुढे म्हणाले, फोंड्यात आयडी हॉस्पिटलचे रूपांतर कसे करता येते आणि आरोग्यसेवा प्रत्यक्षात कशा दिल्या पाहिजेत हे आम्ही दाखवून देऊ.

अशा उपक्रमांसाठी राजकीय इच्छाशक्ती प्रामाणिक असणे आवश्यक आहे आणि ती इच्छाशक्ती आमच्याकडे आहे, कारण आम आदमी पार्टी ही सामान्य माणसांतून उदयाला आलेली पार्टी आहे. यादरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी तेथील श्री शांतादुर्गा मंदिराला भेट देऊन गोवा आणि नागरिकांच्या शांती, सलोखा आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली.

आपकडून मोतिबिंदूच्या मोफत शस्त्रक्रिया...

टाऊन हॉल मध्ये नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना 'आप'चे राज्य अध्यक्ष वाल्मिकी नाईक म्हणाले की, भाजपची डीडीएसएसवाय योजना मोतीबिंदू शस्त्रक्रिया कव्हर करत नाही, जी एक अत्यंत सामान्य डोळ्यांची शस्त्रक्रिया आहे. आमचे आमदार विरोधी पक्षात असतानाही मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपलब्ध करून देत आहेत. यावरून केवळ 'आप' कडेच हे करण्याची खरी इच्छाशक्ती आहे, हे स्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT