online fraud pudhari photo
गोवा

900 Crore Online Fraud | 900 कोटी रुपयांच्या ऑनलाइन फसवणूक प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची गोव्यात धडक कारवाई

900 Crore Online Fraud | मुंबई गुन्हे शाखेची राज्यात कारवाई; 10 जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून सुमारे ९०० कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा पर्दाफाश मुंबई गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणाचा तपास करताना या नेटवर्कचे गोव्यातील कनेक्शन समोर आले असून पोलिसांनी गोव्यासह विविध ठिकाणी कारवाई केली.

मुंबई पोलिसांनी ४ ऑगस्ट २०२६ रोजी गोव्यातील कांदोळी येथील 'कासा दी निकोल' या आलिशान व्हिलावर छापा टाकला होता. या ऑनलाइन फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचे व्यवहार हाताळण्यासाठी हायटेक कार्यालय उभारण्यात आले होते. पथकाने केलेल्या कारवाईच्या या कार्यालयात २४ तास विविध शिफ्टमध्ये १२ तरुण काम करत असल्याचे आढळले.

पोलिसांनी तेथून १५ लॅपटॉप, ८५ मोबाईल फोन, १२८ एटीएम कार्ड, ७६ मोबाईल सिमकार्ड आणि २२ बँक चेकबुक व ७७ बँक पासबुक जप्त केले. या टोळीने जमा केलेले पैसे एका क्लिकवर हजारो म्युल (बोगस) खात्यांमध्ये पाठवत असत. या नेटवर्कशी जोडलेली सुमारे ७५०० बँक खाती गोवून पोलिसांनी १२० कोटी रुपये आतापर्यंत जप्त केले आहेत. त्यामुळे गोव्यातील कारवाईची सखोल चौकशी सुरू आहे.

या नेटवर्कमार्फत सुमारे ९०० कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्ह्यातील पैसा श्रीलंका, चीन आणि इतर देशांमध्ये पाठवला जात असल्याचे पोलिसांनी शोधून काढले आहे. मुंबईतील मश्रिद बंदर परिसरात एका इमारतीत सुरू असलेल्या बोगस कंपनीवर कारवाई करण्यात आली.

या कंपनीमार्फत मुंबईतील विविध बँकांमध्ये बोगस चालू खाती उघडून त्यांचा वापर आर्थिक गैरव्यवहारासाठी केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मोहम्मद शबीर याच्या चौकशीत या नेटवर्कच्या मुख्य सूत्रधाराबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली.

दुबईत बँक खाते उघडण्यासाठी ५० ते ७० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून तरुणांना या रॅकेटमध्ये सहभागी करून घेतले जात असल्याचेही समोर आले. सिंडिकेटचा प्रमुख दुबईत:या सिंडिकेटचा प्रमुख दुबईत असल्याचे तपासात समोर आले आहे.

फसवणुकीतून मिळालेला पैसा विविध खात्यांमध्ये वळवण्यासाठी आणि नंतर तो पुन्हा दुबईला पाठवण्यासाठी विशेष ॲप विकसित करण्यात आले होते. या ॲपच्या माध्यमातून काही सेकंदांत हजारो खात्यांमध्ये पैसे मळवले जात असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत आणि फसवणुकीची रक्कम नेमकी कोणत्या मार्गाने परदेशात पाठवली जात होती, याचा शोध मुंबई गुन्हे शाखा घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT