मडगाव : बैदुर्डे ते पोळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या २२ किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तब्बल ९५२ कोटी रुपये खर्चुन हा मार्ग विकसित केला जाणार असून ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे. सुमारे अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन रानटी प्राण्यांच्या अधिवासावर होणारा परिणाम, वाढते तापमान आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उपाययोजनांची आवश्यकता अधोरेखित होत आहे.
विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधत हा प्रकल्प राबविण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर उभे आहे. ९५२ कोटी रुपये खर्चुन हा मार्ग विकसित केला जाणार असून ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे. सुमारे अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या चौपदरीकरणामुळे आंतरराज्य वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार असली, तरी मार्गालगतच्या साडेसहा हजार झाडांच्या संभाव्य तोडीमुळे पर्यावरणप्रेमींनी चिता व्यक्त केली आहे.
सध्या दुपदरी असलेल्या या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार असून प्रकल्पात १९ बसथांबे, सात लहान पूल, ७८ कल्व्हर्ट, पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पदपथ, हायमास्ट दिवे, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनेक अंडरपास आणि ४४ नवीन जंक्शन उभारण्यात येणार आहेत. पोळे येथे टोल नाका उभारण्याचाही प्रस्ताव आहे. डोंगर कापण्याची गरज कमी करण्यासाठी सुमारे दीड किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड वायडक्ट कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे.
प्रकल्पासंदर्भात आयोजित सार्वजनिक सादरीकरणात ग्रामस्थांनी गुळे, पाडी आणि पोळे परिसरात रानटी प्राण्यांच्या सुरक्षित हालचालींसाठी अंडरपास उभारावेत, तसेच चार रस्ता ते माशे या अपघातप्रवण मार्गावरील धोकादायक वळणांमध्ये तातडीने सुधारणा कराव्यात, अशी मागणी केली. सार्वजनिक बांधकाम खात्याने मार्गालगतच्या साडेसहा हजार झाडांचे सीमांकन केले असून प्रत्यक्षात किती झाडे तोडली जाणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी वेर्णा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या चौपदरीकरणासाठी ८० झाडे तोडण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने या प्रकल्पाकडेही विशेष लक्ष लागले आहे. पर्यावरणप्रेमी अभिजीत प्रभुदेसाई यांनी विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज अधोरेखित केली. तापमानवाढ, हवामानातील बदल आणि झाडांची मोठ्या प्रमाणावर होणारी तोड यामुळे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे सरकारने पर्यावरणपूरक पर्यायांचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आवाहन
बैदुर्डे-पोळे चौपदरीकरणामुळे राज्यातील वाहतूक आणि आर्थिक विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. मात्र, साडेसहा हजार झाडांच्या संभाव्य तोडीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे. रानटी प्राण्यांच्या अधिवासावर होणारा परिणाम, वाढते तापमान आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उपाययोजनांची आवश्यकता अधोरेखित होत आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधत हा प्रकल्प राबविण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर उभे आहे