Accident File Photo
गोवा

Goa Road Accidents | गोव्यात यंदाच्या वर्षात 198 भीषण रस्ते अपघातांमध्ये 208 जणांचा मृत्यू; प्रशासनाची चिंता वाढली

Goa Road Accidents | तीन दिवसांत मद्यापानाचे 93, विनाहेल्मेट वाहनचालकांची 76 प्रकरणे नोंद

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात यंदा आतापर्यंत १९८ प्राणघातक अपघातांमध्ये तब्बल २०८ जणांचा मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कारवाईसोबतच अपघातप्रवण ठिकाणांवर सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे.

९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान राबवण्यात आलेल्या तीन दिवसीय विशेष मोहिमेत वाहतूक पोलिसांनी मद्यपान केलेले ९३ गुन्हे नोंदवले. हेल्मेट न घालता दुचाकी चालवण्याचे ७६ गुन्हे दाखल करण्यात आले. परवान्याशिवाय वाहन चालवल्याप्रकरणी दोन प्रकरणे नोंदवण्यात आली. खासगी वाहन भाड्याने दिल्याचे एक प्रकरण समोर आले.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना नागरिकांना दंडाची कारवाई अन्यायकारक वाटणार नाही, अशा पद्धतीने काम करण्याची गरज व्यक्त केली. वाहतूक अधिकाऱ्यांसाठी आयोजित कायदेविषयक प्रशिक्सनात त्यांनी रस्ता सुरक्षा आणि जबाबदार वाहनचालकांच्या वर्तनावर अधिक भर देण्याचे आवाहन केले.

अपघात ठिकाणाचा होतो अभ्यास
अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी आणि अशा घटना टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाला उपाययोजना सुचवण्यासाठी अधिकारी प्रत्येक प्राणघातक किंवा गंभीर अपघाताच्या घटनास्थळी भेट देतात व त्यामागील कारणे शोधण्याचा अभ्यास केला जातो.

स्थानिक प्रशासनाला पाठवलेल्या प्रस्तावांमध्ये रस्ते रुंदीकरण, स्लिपवे आणि स्पीड ब्रेकर बांधणे, रस्त्यावरील खुणा रंगवणे आणि वाहतूक चिन्हे लावणे यांचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाला आवश्यक उपाययोजनांची शिफारस केली जाते.

रस्ते रुंदीकरण, स्लिपवे उभारणे, स्पीड ब्रेकर बसवणे, रस्त्यावरील दिशादर्शक व खुणांचे रंगकाम तसेच वाहतूक फलक बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. नियमांची अंमलबजावणी अशा प्रकारे केली पाहिजे की दंड भरताना नागरिकांना अन्याय झाल्यासारखे वाटू नये, असे मत अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले.

५० अपघातप्रवण क्षेत्रे
गोवा पोलिसांनी २०२५ मध्ये राज्यभरात ५० अपघातप्रवण ठिकाणे निश्चित केली होती. यामध्ये २५ अपघातप्रवण क्षेत्रे आणि २५ 'ब्लैक स्पोट'चा समावेश आहे. उत्तर गोव्यात २८ ठिकाणे असून त्यात १३ अपघातप्रवण क्षेत्रे आणि १५ ब्लॅक स्पोट आहेत. दक्षिण गोव्यात २२ ठिकाणे असून पैकी १२ अपघातप्रवण क्षेत्रे आणि १० ब्लॅक स्पोट आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT