Latest

Goa Politics | काँग्रेस सोडून भाजप प्रवेश केलेले गोव्याचे ७ आमदार अमित शहांना भेटले

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसला रामराम करीत अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या गोव्यातील सात आमदारांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister of Goa Pramod Sawant) तसेच प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे हेही हजर होते. (Goa Politics)

गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये (Goa Politics) प्रवेश केला होता. एकीकडे राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेला सुरुवात झालेली असतानाच गोव्याचे आठ आमदार फुटल्याने काँग्रेसला जबर धक्का बसला होता. भाजपवासी झालेल्या दिगंबर कामत, मायकल लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस तसेच आलेक्स सिक्वेरा या सात आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली.

वरिष्ठ नेत्यांच्या भेटीवेळी मायकल लोबो हे मात्र काही कारणांमुळे उपस्थित नव्हते. राज्यात चांगले प्रशासन देणे आणि लोकांच्या समस्यांची सोडवणूक करण्याच्या मुद्द्यावर वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्याचे तानवडे यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. सोमवारी रात्रीच सात आमदार गोव्याला परतल्याचे समजते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT