Latest

कोल्ह्याच्या पाच नवजात पिलांंना जीवदान

अमृता चौगुले

मंचर : पुढारी वृत्तसेवा : मंचर वनक्षेत्र परिसरातील रेस्क्यू टीमच्या सदस्यांमुळे उसातील शेतात आढळलेल्या कोल्ह्याच्या पाच नवजात पिल्लांना जीवदान मिळाले. ही घटना आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे घडली. वन्य मित्रांनी कोल्ह्याच्या पिलांना दिलेल्या जीवनामुळे रेस्क्यू टीमचे कौतुक केले आहे. लाखणगाव येथील पाचर्णे वस्ती येथे रामदास दगडू शेजवळ यांच्या शेतात भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची ऊसतोडणी सुरू आहे. या वेळी उसात कोल्ह्याची पाच नवजात पिल्ले ऊसतोडणी कामगारांना आढळून आली होती. लाखणगाव येथील रेस्क्यू टिम सदस्य विजय कानसकर, दत्तात्रय राजगुरव यांनी मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस आणि वनरक्षक साईमाला गिते यांना माहिती दिली. लाखणगाव येथे घटनास्थळी टीम पोहोचली.

स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक साईमाला गिते, रेस्क्यू टिम सदस्य दत्तात्रय राजगुरव, शिंगवे, विजय कानसकर आणि वन कर्मचारी जाधव यांनी साईटवर प्रथम पिलांना प्लास्टिक घमेल्यात पाचटाचे आच्छादन करून त्यात पिल्ले सावलीत सुरक्षित ठेवली. ही एकूण पाच पिले होती. ऊसतोडणी कामगार बाजूला गेल्यावर पाचपैकी एक पिलू कोल्ह्याच्या मादीने सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. उरलेली चार पिले त्याच ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून ठेवली. पिलांनी डोळेही उघडले नव्हते. सर्व जण त्या ठिकाणाहून दूर अंतरावर जाऊन लक्ष ठेवून होते. संध्याकाळी सातनंतर मादी पिल्लांना शोधत आली व एक-एक करत सर्व पिलांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT