जेनेलिया डिसूझा 
Latest

Genelia Deshmukh : आमच्या जेनेलिया वहिनी म्हणत नेटकऱ्यांनी रितेशच्या बायकोला…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया डिसूझाने भलेही बराच काळ चित्रपट केला नसेल, पण त्यानंतरही तिचे सोशल मीडियावर वर्चस्व आहे. १० वर्षांच्या ब्रेकनंतर जेनेलिया पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अभिनेत्री जेनेलिया (Genelia Deshmukh ) आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच अपडेट देत असते. तिचा फॅशन सेन्स इतका अफलातून आहे की, तिचा ग्लॅमरस लुक पाहून कोणीही अंदाज लावू शकत नाही की ती दोन मोठ्या मुलांची आई देखील आहे. तिचा ग्लॅमरस अंदाज आणि सौंदर्य दोन्हीही टिकून आहे. आताही जेनेलियाने साडीत सुंदर फोटोशूट केला असून नेटकरी मात्र 'आमची वहिनी' म्हणत तिचं कौतुक करत आहेत. (Genelia Deshmukh )

जेनेलियाने वयाची ३५ शी ओलांडली आहे. तरीही तिचे सौंदर्य अबाधित आहे. वास्तविक, जेनेलिया डिसूझाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती हलक्या रंगाची अतिशय क्लासिक साडी परिधान केलेली दिसते. क्रिम कलरच्या साडीत जेनेलिया खूप गॉर्जियस दिसते. नाकात नथ, कपाळावर टिकली आणि कानात झुमके असा लूक तिचे सौंदर्य आणखी खुलवतो. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

तिने हा पोशाख भारतातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि इंडस्ट्रीत तीस वर्षांहून अधिक काळ घालवलेल्या जे जे वलाया यांच्या संग्रहातून निवडला आहे. डिझायनरच्या या पारंपरिक पोशाखात तिचा लूक सुरेख दिसत होता.

सिल्क फॅब्रिकपासून बनवलेली पूर्ण साडी

अभिनेत्रीने परिधान केलेली ऑफ-व्हाईट रंगाची साडी पूर्णपणे सिल्क फॅब्रिकपासून बनलेली होती.

ब्लाऊजने वेधले लक्ष

टिश्यू सिल्कपासून बनवलेल्या, जेनेलिया डिसूझाने या साडीसोबत अतिशय स्टायलिश ब्लाउज घातला होता.
तिने डोळ्यांच्या मेकअपसाठी पीच आणि चमकदार आयशॅडोचा वापर केला आणि ओठांवर सिंदूर शेड लिप कलर लावला होता. ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखी खुलले आहे.

हेदेखील वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT