Latest

Gautam Gambhir KKR Mentor IPL 2024 | गौतम गंभीरची शाहरुखच्या ‘केकेआर’मध्ये वापसी, मिळाली ‘ही’ जबाबदारी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर २०२४ च्या आगामी आयपीएल हंगामात शाहरुख खान सहमालक असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचा 'मेंटॉर' असणार आहे. याआधी गौतम गंभीरने लखनौ सुपर जायंट्स संघाचा 'मेंटॉर' म्हणून काम पाहिले आहे. आता लखनौ संघाचे 'मेंटॉर' पद त्याने सोडले आहे. आता तो कोलकाता नाइट रायडर्सशी जोडला गेला आहे. (Gautam Gambhir KKR Mentor IPL 2024) याबाबतची घोषणा कोलकाता नाइट रायडर्सने त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवर पोस्ट करत केली आहे. गंभीरचा फोटो पोस्ट करत केकेआरने 'वेलकम बॅक होम' असे म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

२०१२ आणि २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल जिंकले तेव्हा गौतम गंभीर संघाचा कर्णधार होता. "मी भावनिक व्यक्ती नाही आणि अनेक गोष्टी मला प्रवृत्त करत नाहीत. पण हे वेगळे आहे," असे गंभीरने एका निवेदनात म्हटले आहे. "हे सगळे जिथून सुरू झाले तिथे परत आले आहे. आज पुन्हा एकदा त्या जांभळ्या आणि सोन्याच्या रंगाची जर्सी घालण्याचा विचार करतो तेव्हा माझा कंठ दाटून येतो आणि मन भरून येते."

टी२० (२००७) आणि एकदिवसीय (२०११) विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला गंभीर २०११ मध्ये कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाला होता आणि २०१७ पर्यंत तो संघात होता. या कालावधीत केकेआर संघ पाच वेळा आयपीएल प्लेऑफसाठी पात्र ठरला (यात त्यांनी स्पर्धा जिंकलेल्या दोन वर्षांचाही समावेश) आणि २०१४ मध्ये चॅम्पियन्स लीग T20 च्या अंतिम फेरीत पोहोचला होता.

"गौतम नेहमीच आमच्या कुटुंबाचा भाग आहे आणि हा आमचा कर्णधार 'मेंटॉर' म्हणून वेगळ्या अवतारात घरी परतत आहे," असे केकेआरचे सहमालक शाहरुख खान याने X वर पोस्ट करत म्हटले आहे. "त्याची खूप उणीव भासली होती आणि आता आम्ही सर्वजण चंदू (चंद्रकांत पंडित) सर आणि गौतम यांच्याकडे कधीही हार न मानणारी भावना आणि त्यांच्यासाठी उभे असलेले खेळाडू KKR संघासोबत जादू निर्माण करण्यासाठी उत्सुक आहोत."(Gautam Gambhir KKR Mentor IPL 2024)

कोलकाता नाइट रायडर्स हा २००८ मध्ये आयपीएलच्या सुरुवातीपासून प्रत्येक हंगामाचा भाग असलेल्या संघांपैकी एक आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT