गणेशाची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी गणेश भक्तांनी काही गोष्टी लक्षात ठेवले पाहिजेत Pudhari File Photo
गणेशोत्सव विशेष

Ganesh Chaturthi 2024 : 'श्री' बाप्पाच्या प्रतिष्ठापनेनंतर गणेश भक्तांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्या शनिवारी (दि.७) गणरायाचे आगमन होणार असून त्याच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. गणरायाच्या प्रतिष्ठपनेसाठी घरोघरी उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. अनेक गणेश भक्त घरगुती सजावटीमध्ये व्यस्त झाले आहेत.

ज्योतिषांच्या मते, गणेश चतुर्थी हा सण नवीन सुरुवात, समृद्धी आणि अडथळे दूर करण्याचे प्रतीक आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश भक्त आपल्या घरासह दुकानात व कार्यालयातही गणेशाची प्रतिष्ठापना करतात. गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर गणेश भक्तांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. आपल्या लाडक्या बापाच्या आगमनानंतर गणेश भक्तांनी काही नियम आहेत, ते पाळायला हावेत.

गणेशाच्या प्रतिष्ठापनेनंतर गणेश भक्तांनी 'या' गोष्टी लक्षात ठेवायला हाव्यात

  • गणेशाला तुळशीचे पान अर्पण करू नये

  • पूजेदरम्यान काळे कपडे परिधान करू नयेत.

  • दुर्वा आणि मोदकाशिवाय पूजा पूर्ण होत नाही, हे गणेशभक्तांनी लक्षात ठेवावे.

  • गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर स्थापित मूर्तीला हलवू नये

  • श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत कोणीतरी सतत उपस्थित रहावे.

  • ज्या ठिकाणी गणेश प्रतिष्ठापना करणार आहात, ती जागा स्वच्छ करावी, तेथे कोणतीही अशुद्धता आणि कचरा असू नये.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT