एकवीस दिवसांच्या मुक्कामांचे गणपती ही रायगड जिल्ह्यातील घरगुती गणेशोत्सवातील अत्यंत प्राचीन अशी परंपरा आहे. पाच ते सहा पिढ्यांपासून ही एकवीस दिवसांच्या गणपतींची परंपरा रायगड जिल्ह्यात चालत आली आहे. प्राचीनकाळचे गणेश विषयक माहिती देणारे श्रीगणेशपुराण आणि श्रीमुद्रलपुराण हे दोन महत्वपूर्ण ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. यामध्ये गणपतीची एकूण अकरा प्रमुख व्रते सांगण्यात आली आहेत. त्यात वरद चतुर्थी व्रत, दुर्वा गणपती व्रत, कपर्दी विनायक व्रत, पार्थिव गणेशपूजा व्रत, गणेश चतुर्थी व्रत, वटगणेश व्रत, संकष्ट हर चतुर्थी व्रत, तिळी चतुर्थी व्रत, अंगारकी चतुर्थी व्रत, संकष्ट चतुर्थी व्रत आणि एकवीस दिवसांचे गणपती व्रत या व्रतांचा समावेश आहे. (21 days of Ganesha tradition)
यातील एकवीस दिवसांचे गणपती व्रत हे सर्वसाधारणपणे रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीतील कोळी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. यंदा रायगड जिल्ह्यात एकवीस दिवसांचे ३७० घरगुती गणपती विराजमान झालेले आहेत. कोळी बांधवांचा मारेमारी हा व्यवसाय खवळत्या सागराशी मुकाबला करतच करावा लागतो आणि अशा वेळी काही अरिष्ट वा विघ्य त्या कोळ कुंटूंबावर आले तर एकवीस दिवसांचे गणपती व्रत केल्यावर ते कायम स्वरुपी दूर होते अशी दृढश्रद्धा कोळी बांधवांमध्ये आहे. आणि कुंटूंबावर आलेले विघ्न दूर करण्याकरिता एकवीस दिवसांचे गणपती व्रत केल्यावर तेथेच या एकवीस दिवसांची परंपरा त्या कुटूंबांमध्ये सूरु होते आणि पूढील पिढ्यापिढ्या ते व्रक अत्यंत श्रद्धेने अबाधीत राखतात आणि २१ दिवस गणरांयांची सेवा करतात अशी माहिती अलिबाग कोळी वाड्यातील मधला पाडा येथील चौथ्या पिढीचे शतकोत्तस एकवीस दिवसांचे गणपती व्रत करणारे जगन वरसोलकर यांनी दैनिक पुढारी शी बोलताना दिली आहे.
जगन वरसोलकर यांचे पणजोबा महादेव गोविंद वरसोलकर यांच्या कुंटूंबावर सुमारे शंभर वर्षापूर्वी काही विघ्न आले होते, त्यावेळी त्यांनी एकवीस दिवसांचे गणपती व्रत करण्याचा निर्णय घेतला. त्यावर्षी त्यांनी हे व्रत केले आणि कुटूंबावरील विघ्न दूर झाले आणि त्यांनी एकवीस दिवसांचे गणपती व्रत त्यांच्या संपूर्ण हयातीत दरवर्षी पूढे सुरु ठेवले. त्याच्या पश्चात आमचे आजोबा मुकुंद वरसोलकर यांनी देखील हे व्रत त्यांच्या संपूर्ण हयातीत कायम ठेवले आणि त्यांच्या पश्चात आमचे वडील भगवान मुकुंद वरसोलकर यांनी हे एकवीस दिवसांचे गणपती व्रत कायम ठेवले आहे. ते आज ६८ वर्षांचे आहेत. आता आमची चौथी पिढी असून आम्ही देखील हे एकवीस दिवसांचे गणपती व्रत कायम सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे जगन वरसोलकर यांनी सांगीतले.
वरसोलकर यांच्या कुंटूंबाने सांगीतलेली एकवीस दिवसांचे गणपती व्रताची महती ही प्रातिनिधीक असून एकवीस दिवसांचे गणपती व्रत करणाऱ्या सर्वच कुंटूंबात हीत श्रद्धेची भावना असल्याचे दिसून येते.
जगन वरसोलकर यांचे पणजोबा महादेव गोविंद वरसोलकर यांच्या कुंटूंबावर सुमारे शंभर वर्षापूर्वी काही विघ्न आले होते, त्यावेळी त्यांनी एकवीस दिवसांचे गणपती व्रत करण्याचा निर्णय घेतला. त्यावर्षी त्यांनी हे व्रत केले आणि कुटूंबावरील विघ्न दूर झाले आणि त्यांनी एकवीस दिवसांचे गणपती व्रत त्यांच्या संपूर्ण हयातीत दरवर्षी पूढे सुरु ठेवले. त्याच्या पश्चात आमचे आजोबा मुकुंद महादेव वरसोलकर यांना देखील हे व्रत त्यांच्या संपूर्ण हयातीत कायम ठेवले आणि त्यांच्या पश्चात आमचे वडील भगवान मुकुंद वरसोलकर यांनी हे एकवीस दिवसांचे गणपती व्रत कायम ठेवले आहे.