ढोल ताशांच्या निनादात, गुलालाची उधळण करत श्री गणरायांचे शहरात मोठ्या धूमधडाक्यात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. pudhari photo
गणेशोत्सव

Sambhajinagar Ganeshotsav 2026 : ताशाचा आवाज तररर झाला... बाप्पांचे धूमधडाक्यात आगमन

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया.. चा जयघोष, अवघे शहर भक्तिमय, गणेशभक्तांमध्ये उत्साह

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ताशाचा आवाज तरास झाला अन गणपती माझा नाचत आला आला उपळीत रंग गुलाला.. अचना हो साझा गणराया... त्या तालावर थिरकत आणि गणपती बाप्पा मोरया. मंगलभूती मोरया च्या जयघोषात सोमवारी (दि. १४) गणरायांचे घरोघरी सार्वजनिक गणेश मंडळांत मोठ्या दिमाखात आगमन झाले. पारंपरिक दीन-नाशात्मा जगत वाजत-गाजत आणि गुलालाची उधळण कान संहरवासीयांनी अत्यंत उत्साहाने जल्लोषात लादनाचे स्वागत केले यामुळे अवघे शहर मक्तिमय झाले यदा बाप्पाचा पर दिवस मुक्काम असणार असल्याने भवतांचा आनंद द्विगुणित मला आहे.

प्रतिवर्षांप्रमाणे यंदाही गणेशोत्सव

यूमधडाक्यात साजरा केला जात आहे. त्यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण असून, सोमवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायांच्या आगमनाचा क्षण आल्याने भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला. नाडक्या बाप्पांना घरी नेण्यासाठी सकाळपासूनच सर्वांची लगबग सुरू होती. त्यामुळे जिल्हा परिषद मैदान, संभाजीपेठ, गुलमंडी, जवाहर कॉलनी, सेव्हन हील, टीव्ही सेंटर भागात मोठी गर्दी झाली. अनेक जण सहकुटुंब, मित्रपरिवारासह गणेशमूर्ती खरेदीसाठी आले होते.

लहान मुलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. आपली आवडती श्री गणेश मूर्ती खरेदी करून कुणी डोक्यावर, कुणी दुचाकीवर, कुणी हातगाडीवर, तर कुणी चारचाकीत नेत होते. सर्वांकडून गुलाल उधळत एक, दोन, तीन, चार-गणपतीचा जयजयकार आणि गणपती बाप्पा मोरया.. असा जयघोष सुरू होता. सायंकाळी संभाजीपेठ, पैठणगेट, गुलमंडी, मछलीखडक, सिटी चौक, सराफा रोड, शहागंज, राजाबाजार, चौराहा, नवाबपुरा येथील रस्त्यांवर गणरायांच्या स्वागत मिरवणुकीचा मोठा जल्लोष चचायला मिळाला. रात्रीपर्यंत घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांत मूर्ती विराजमान झाल्या.

गणेश मंडळांच्या स्वागत मिरवणुका लक्षवेधी शहरातील विविध गणेश मंडळांकडून गणेशोत्सवानिमित्त पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात तसेच मुंबई, जळगावचे बँड पथक बोलावून वाजतगाजत मिरवणुकीव्दारे गणरायांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. यात दरवर्षी शहराचे आकर्षण असणारी धावणी मोहल्ला येथील बाल कन्हैय्या गणेश मंडळाची नवसाच्या राजाच्या मोहक-विशाल मूर्तनि यंदाही सर्वांचे लक्ष वेधले. पैठणगेट येथून ढोल-ताशांच्या गजरात आतषबाजी करत सायंकाळी निघालेली मिरवणूक गुलमंडी, मछलीखड़क, सराफा रोड मार्गे धावणी मोहल्ला येथे पोहोचली. चर्तुथीच्या राजाची मिरवणूक संभाजीपेठ येथून गुलमंडी मार्गे केळीबाजार येथे पोहचली.

गणेशोत्सवानिमित्ताने बाजारात पूजेचे आणि सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली. आवडती गणेशमूर्ती खरेदी केल्यानंतर त्यानुसार सजावटीचे साहित्य खरेदीसाठी लगबग दिसून आली. लाहटींग, फुलांच्या माळा, महर, तोरण, मखमली कापड, लाकडी रंगीत पाट खरेदीला पसंती दिली.

शाडूच्या मूर्तीना पसंती

पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूतींना पसंती वाढत आहे. अनेकजण पीओपीऐवजी शाहू मातीच्या आणि लाल मातीच्या मूर्ती खरेदी करताना दिसले. या मूर्ती तुलनेत महाग असूनही घराघरात शाडू मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

५० टन फुलांची आवक

गणेशोत्सवानिमित्ताने सोमवारी शहरात गुलाब, झेंडू, निशिगंधा, शेवंतीसह विविध फुलांची सुमारे ५० रन क्वेिंटल आवक झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात फुले आल्याने होलसेल मार्केटमध्ये फुलांचे भाव गडगडले. झेंडू ३० किलोवरून २० रुपयांवर, शेवंती ७० वरून ५० रुपये किलोपर्यंत खाली आले. गुलाब २०० ते २५० रुपये किलो, गलांडा ३० रुपये, निशिगंध २५० ते ३०० रुपये किलो प्रमाणे विक्री झाल्याचे सिटीचौक फुल बाजारातील घाऊक फुल विक्रेते स्वी बेर्डे यांनी सांगितले. फुलांच्या माळा आणि तयार हार यांचे भाव मात्र तेजीतच होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT