ठाणे,पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाचे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये बलात्कार व धमकी देणे असे त्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत. या दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.
मुख्य न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात गुरुवारी (दि.21) या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी युक्तिवाद झालेनंतर 27 एप्रिल रोजी पुढील सुनावणी घेण्यात येईल असा निर्णय न्यायालयाने दिला. त्यानुसार ही सुनावणी आता 27 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात रिव्हॉल्वर दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर गुरुवारी ठाणे न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. हा गुन्हा खोटा असून नाईकांना जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता. तर पीडितेच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनास विरोध दर्शविला. दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर पुढील सुनावणी 27 एप्रिल रोजी घेण्यात येईल असे कोर्टाने स्पष्ट केले.
हेही वाचा