गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा भामरागड तालुक्याच्या सीमावर्ती भागातील मुसपर्शी गावानजीकच्या जंगलात आज (शनिवार) सकाळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी एका नक्षल्यास कंठस्नान घातले आहे. हा परिसर छत्तीसगड सीमेला लागून असून, अबुझमाड नावाने ओळखला जातो.
आज सकाळपासून पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान मुसपर्शी परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीले होते. पोलिसांना पाहताच नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, एका पुरुष नक्षल्याचा मृतदेह सापडला. शिवाय नक्षल्यांच्या ३ बंदुका आणि दैनंदिन वापराचे साहित्यही पोलिसांच्या हाती लागले आहे. चकमकस्थळ घनदाट जंगलाने वेढलेले असून, चकमक अजूनही सुरुच असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.
हेही वाचा :