gadar 2 
Latest

Gadar 2 Poster : ‘गदर 2’ चे पहिले पोस्टर रिलीज, डेट आली समोर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रजासत्ताक दिनानिमित्त सनी देओल आपल्या फॅन्ससाठी दमदार सरप्राईज घेऊन हजर झालाय. त्याच्या मोस्ट अवेटेड गदर २ चे पहिले पोस्टर समोर आले आहे. त्याचसोबत चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणादेखील निर्मात्यांनी केलीय. काही महिन्यांपूर्वी त्याने २००१ मध्ये रिलीज ब्लॉकबस्टर चित्रपट 'गदर'च्या सीक्वलची घोषणा केली होती. 'गदर' २ च्या शूटिंग दरम्यान बीटीएस व्हिडिओदखील समोर आला आहे. आता २६ जानेवारीच्या निमित्त निर्मात्यांनी सनी देओल आणि अमीषा पटेल स्टारर 'गदर २' च्या रिलीज डेटसोबत या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.

सनी देओलच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक 'गदर' चा सीक्वल 'गदर २' चे पोस्टर रिलीज करण्यासाठी प्रजासत्ताक दिवस निवडण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केलं आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर जबरदस्त दिसत आहे. पोस्टरमध्ये सनी देओलने ब्लॅक रंगाचा कुर्ता-पायजमा घातला आहे. त्याच्या डोक्यावर पगडी बांधलेली दिसतेय. त्याचा लूक शानदार दिसत आहे. हातात मोठा हातोडा आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावर अँग्री यंग मॅन लूक दिसत आहे. या पोस्टरमध्ये मागे गाड्या उडताना दिसत आहेत. 'पाकिस्तानात' जाऊन 'हिंदुस्तान जिंदाबाद'ची घोषणा देणाऱ्या सनी देओलच्या 'गदर २' च्या पोस्टरवर 'हिंदुस्तान जिंदाबाद' लिहिलेले दिसते.

२६ जानेवारीला या चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि रिलीज डेटची घोषणा निर्मात्यांनी केलीय. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल. अमीषा पटेल आणि सनी देओल शिवाय चित्रपटात दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मादेखील दिसणार आहे.

एका युजरने लिहिलंय, 'बास फक्त तुम्ही हा चित्रपट रिलीज करा, बाकी आम्ही सांभाळतो.' अन्य एका युजरने लिहिलं, 'गदर मचा देगी भाई ये, हिंदुस्तान मेरी जान'. फॅन्सशिवायस्टारदेखील हे पोस्टर पाहून चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT