Latest

Delhi airport | विमानाला पक्षी धडकला, दिल्ली विमानतळावर आपत्कालीन स्थिती

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दुबईला जाणार्‍या फेडेक्स (FedEx) विमानाला उड्डाणानंतर लगेचच पक्षी धडकला. यामुळे दिल्ली विमानतळावर संपूर्ण आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली असल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. आज FX5279 या विमानाला उड्डाणानंतर पक्षी धडकला. त्यानंतर विमान सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्यात आले.

या विमानाने दुपारी १.४४ वाजता पुन्हा उड्डाण केले. दुबईला जाणारे विमान FedEx द्वारे ऑपरेट केले जाते. दुबई येथे या विमानाची नियोजित लँडिगची वेळ दुपारी ३.२९ वाजता आहे. पक्षी धडकण्याच्या घटना सामान्य असल्यातरी खराब हवामानामुळे गेल्या काही दिवसांत दिल्ली विमानतळावरून अनेक प्रवासी विमाने अन्य ठिकाणी वळवण्यात आली होती. गुरुवारी खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरून जवळपास २२ उड्डाणे वळवण्यात आली होती.

सूत्रांनी सांगितले की, विमानाला पक्षी धडकण्याच्या घटना सामान्य नाहीत. पण यामुळे मोठ्या तांत्रिक समस्या निर्माण होतात आणि त्या घातक ठरू शकतात. गेल्या महिन्यातही अशीच घटना घडली होती. पुण्याला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानाला पक्षी धडकला होता. यामुळे या विमानाला भुवनेश्वरमधील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या विमानाने विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानाला पक्षाची धडक बसली होती.

फेब्रुवारीमध्ये सुरतहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला टेकऑफच्या वेळी पक्षी धडकला होता. यामुळे हे विमान अहमदाबाद येथे लँडिंग करण्यात आले होते.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT