पॅरिस; वृत्तसंस्था : वाहतुकीचे नियम मोडल्याने पोलिसांकडून गोळीबारात एक मुलगा ठार झाल्यानंतर फ्रान्समध्ये सलग तिसर्या दिवशी हिंसाचार व जाळपोळ झाली. पॅरिसपाठोपाठ देशाच्या विविध भागांमधून पोलिसांविरोधात आंदोलन तीव्र झालेले आहे. (France violence)
पोलिसांवर हल्ले होत आहेत. पोलिसांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. शेकडो गाड्या पेटविण्यात आल्या आहेत. पोलिसांनी 875 जणांना अटक केली आहे. 200 वर पोलिस कर्मचारी हिंसाचारात जखमी आहेत. (France violence)
मुलाने त्याची कार पोलिसांच्या अंगावर घातल्याने गोळीबार करावा लागल्याचा बचाव पोलिसांनी केला होता; पण या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर तसे काहीही घडले नव्हते, हे स्पष्ट झाले आणि लोकांचा संताप वाढला. मुलाच्या मृत्यूपूर्वीही अशाच स्वरूपाच्या घटनांमध्ये पोलिसांच्या गोळीबारात 13 जण मरण पावलेले आहेत.
अधिक वाचा :