नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : म्यानमारहून दिल्लीत आलेल्या चारजणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. या चौघांच्याही चाचणीचे जिनोम सिक्वेनि्संग केले जाणार असल्याचे सरकारी सूत्रांकडून सोमवारी सांगण्यात आले. चीन आणि जपानमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय मार्गावरुन प्रवास करीत असलेल्या लोकांची विमानतळावरच कोरोना चाचणी केली जात आहे. त्यानुसार दिल्ली विमानतळावर उतरलेले चौघे कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मागील काही दिवसांमधून म्यानमारहून दिल्लीत ६९० प्रवासी आले होते. त्यातील चौघेजण कोरोनाबाधित निघाले आहेत. या चारही जणांना राममनोहर लोहिया रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, बिहारमधील गया येथे बौध्द धर्मगुरु दलाई लामा यांच्या कार्यक्रमास हजर राहण्यासाठी म्यानमारहून काही लोक आले होते. त्यातील चारजणांना कोरोनाचा बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. या कोरोनाबाधितांना बोधगया येथील एका हॉटेलमध्ये आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.
हेही वाचलंत का ?