Latest

कोव्हिडनंतर ‘या’ ४ नव्या आजारांनी वाढवली चिंता; गोचिडीतून होतोय प्रसार | 4 new diseases detected

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्राण्यांतून माणसांना होणारे आजार बरेच आहेत. यातील कोव्हिड, इबोला, सार्स, स्वाईन फ्लू, एचआयव्ही असे काही आजार माणसांसाठी अत्यंत धोकादायक ठरले. यातील कोव्हिडच्या साथीने जगभरात लाखो लोकांचा जीव घेतला. कोव्हिडची साथ नियंत्रणात असली तरी संशोधक प्राण्यांतून माणसांना होणाऱ्या आजारांवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. संशोधकांना आणखी चार असे आजार दिसून आले आहेत. जपान, रशिया आणि चीन येथे आढळलेल्या या आजारांबद्दल संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. (4 new diseases detected)

युरोपमधील द सन या वेबसाईटने हे वृत्त दिले आहे. हे आजार सध्या तरी जपान, रशिया आणि चीनच्या बाहेर आढलेले नाहीत.
प्राण्यांतून माणसांत येणाऱ्या आजारांना झुनॉटिक्स म्हणतात. जगभरात दरवर्षी असे पाच तरी आजार दिसून येतात असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. नव्याने दिसून आलेल्या चार आजारांची यादी युके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी या संस्थेने दिली आहे.
यातील पहिल्या आजाराला ओझेड असे नाव देण्यात आले आहे. २०२२मध्ये या आजाराने जपानमध्ये एका महिलेचा बळी गेला आहे. या आजाराची उत्पत्ती गोचिडीतून झाली आहे. (4 new diseases detected)

तर रशियात चार रुग्णांत हसेकि टिक व्हायरस हा आजार दिसून आला आहे. हा विषाणू डेंग्यू, झिका यांच्या जवळपास जाणारा आहे. रशियातील दोन प्रांतात हा आजार दिसून आला आहे.

कोक्जिला बुर्नेट्टी हा आणखी एक आजार सील या प्राण्यांपासून पसरत आहे. ऑस्ट्रेलियात हा आजार दिसून आला आहे. हा आजार झाला तर गर्भपात होऊ शकतो. तर जपानमध्येच येझो नावाचा गोचिडीतून पसरणाऱ्या आजाराने एका व्यक्ती गंभीररीत्या आजारी होता. या आजारात मृत्यू होण्याचे प्रमाण ४० टक्के इतके जास्त आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT