Latest

param bir singh suspension : परमबीर सिंग यांच्या निलंबन आदेशावर मुख्यमंत्र्यांनी केली स्वाक्षरी?

backup backup

मुंबई : पुढारी ऑनलाईन : तत्‍कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍या आदेशानेच सचिन वाझे आणि इतर दोन पोलीस अधिकाऱ्यांनी १०० कोटी रुपये वसुल केले, असा मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी  केला होता.  या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्तपरमबीर सिंग यांचे  निलंबन हाेण्‍याची शक्यता (param bir singh suspension ) व्‍यक्‍त हाेत आहे. बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता प्रकरणी ही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. एका वृत्तसंस्थेच्या सूत्रांच्या माहितीनुसार, परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्‍या फाईलवर मुख्यमंत्री उद्‍धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबतचा आदेश आजच दिला जाण्याची शक्यता आहे.

param bir singh suspension : परमबीर सिंग यांच्यावर होणार कारवाई ?

परमबीर सिंग यांनी नागरी सेवेच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी चौकशी केली होती. चक्रवर्ती यांचा अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी परमबीर सिंग यांच्यावर कारवाई होणार असल्याचे यापूर्वी स्‍पष्‍ट केले हाेते.

बेशिस्त वर्तन आणि अनियमितता यासाठी परमबीर सिंग यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही पावले टाकत आहोत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई देखील सुरु आहे, असे त्‍यांनी म्‍हटलं हाेतं.

राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल्स, बार, ऑर्केस्ट्रा चालकांकडून पोलिसांना १०० कोटीं रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले हाेते, असा आरोप करुन परमबीर सिंग यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या आरोपांवरुन राज्य शासनाने चांदिवाल आयोग स्थापन केला आहे.

चांदिवाल आयोग गेले काही दिवस सचिन वाझे याची चौकशी करत आहे. यातच सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिल्याने गेले काही महिने अज्ञातवासात गेलेले परमबीर सिंग हे मुंबईत दाखल झाले हाेते.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT