शिवाजी आढळराव पाटील  
Latest

Shivaji Adharao Patil join NCP : माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचा मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश

अविनाश सुतार

शिरूर: पुढारी वृत्तसेवा: शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव – पाटील मंगळवारी (दि. २६) राष्ट्रवादी अजित पवार गटात अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंचर (ता. आंबेगाव) येथील शिवगिरी मंगल कार्यालयात हा प्रवेश होणार आहे. याबाबतची माहिती आढळराव यांनी आज (दि.२५) 'पुढारी न्यूज'ला दिली. Shivaji Adharao Patil join NCP

ते पुढे म्हणाले की, महायुतीतील तिन्ही पक्षाचा सहमतीचा उमेदवार म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी निश्चित झाली आहे. माझ्याबरोबर ठराविकच कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावेळी शिवसेनेचे सगळेच प्रमुख पदाधिकारी महायुतीचा घटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. Shivaji Adharao Patil join NCP

दरम्यान, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, जिल्हा प्रमुख शरद सोनवणे, भगवान पोखरकर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. परंतु, ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार नाहीत. या प्रसंगी केवळ आढळराव यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होणार नाही. दिल्लीतून ग्रीन सिंगल आल्यानंतर महायुतीच्या एकत्रितपणे उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT