मुथय्‍या मुरलीधरन आणि राहुल द्रविड संग्रहित छायाचित्र. 
Latest

Muttiah Muralitharan : मुरलीधरनचा राहुल द्रविडला टोला; म्‍हणाला, “द्रविड महान फलंदाज,पण…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : फिरकीचा जादूगार अशी ओळख असणारा श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्‍या मुरलीधरनचा
( Muttiah Muralitharan ) बायोपिक '800' चा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी सचिन तेंडुलकरसह दिग्‍गज क्रिकेटपटू उपस्‍थित होते. यावेळी मुरलीधरन याने अनेक आठवणी शेअर केल्‍या तसेच त्‍याने टीम इंडियाचा मुख्‍य प्रशिक्षक राहुल द्रविड याला टोलाही लगावला.

राहुलला माझ्‍या गोलंदाजीवर मार्ग सापडत नसे…

यावेळी मुरलीधरन म्‍हणाला की, सध्‍या टीम इंडियाचा मुख्‍य प्रशिक्षक असणारा राहुल द्रविड हा महान फलंदाज होता;पण माझ्‍या गोलंदाजीवर त्‍याला चेंडू वाचण्याचा मार्ग सापडत नसे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यासारखे भारतातील अनेक फलंदाज माझ्‍या गोलंदाजीवर प्रभावी फलंदाजी करत असत. त्‍यांना माझ्‍या फिरकी चेंडूचा अचूक अंदाज येई मात्र राहुल द्रविड अनेकवेळा याबाबत अपयशी ठरत असे. ( Muttiah Muralitharan )
Muttiah Muralitharan : सचिन माझ्‍या गोलंदाजीवर चांगला खेळायचा 

मुरलीधरन म्‍हणाला की, "भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर माझ्‍या गोलंदाजीचा चांगला सामना करायचा; पण बरेच खेळाडू तसे करू शकले नाहीत. वेस्‍ट इंडियचा  ब्रायन लाराही माझ्‍या गोलंदाजीचा प्रभावी सामना करु शकला नाही."

मुरली 'एक्स्प्रेस वे'वरही चेंडू फिरवेल : सचिन तेंडुलकर

यावेळी सचिन तेंडुलकर याने मुरलीधरनबरोबरची पहिल्‍या भेटीची आठवण सांगितले. तो म्‍हणाला, मी पहिल्‍यांदा १९९२-९३ मध्‍ये  मुरलीधरनला भेटलो. तेव्‍हापासून आम्‍ही चांगले मित्र आहोत. तो चेंडू कसा फिरवायचा हे साऱ्या जगाला माहीत होते. 'एक्स्प्रेस वे'वरही तो चेंडू फिरवेल. खेळपट्‍टी कशीही असो त्याने 'दूसरा' टाकायला सुरुवात केली तेव्हा त्याने १८ महिने नेटमध्ये खूप सराव केला, असेही सचिनने सांगितले.

मागील महिन्‍यात मी श्रीलंकेला गेलो होताे. मी तुमच्‍या शहरात आलो आहे, असा मेसेज मी मुरलीधरन याला केला. त्‍यावेळी त्‍याने भारतात असल्याचे सांगितले. यावेळी त्‍याने प्रथम त्याच्या 'बायोपिक'बद्दल सांगितले. यावेळी त्‍याने मला विचारले होते की, तू माझ्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला येशील का? अशी विचारणा त्‍याने केली.  त्‍याचवेळी मी या कार्यक्रमाला येणार असल्‍याचे सागितले होते. मुरलीधरनच्‍या क्रिकेट जीवनप्रवास असणारा हा चित्रपट सर्वांना आवडेल. या चित्रपटासाठी मी मुथय्या मुरलीधरन आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो, असेही सचिनने नमूद केले.

Muttiah Muralitharan : अभिनेता मधुर मित्तल साकारणार मुरलीधरनची भूमिका

ऑस्कर पुरस्कार विजेता 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील अभिनेता मधुर मित्तल '800' चित्रपटात मुथय्या मुरलीधरनची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात मधुर मित्तल याच्‍यासह महिमा नांबियार, नरेन, नस्सर, वेला राममूर्ती, रित्विक, अरुल दास आणि हरी कृष्णन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मुरलीधरन याच्‍या नावावर १३३ कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ८०० बळी घेण्याचा विक्रम आहे. २०१० मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मुरलीधरनने ३५० वन-डे सामन्यात ५३४ आणि १२ टी-20 सामन्यात १३ विकेट त्‍याच्‍या नावावर आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT