नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : भारतात राहून परदेशातील नामवंत विद्यापीठातून शिक्षण घेता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग या महिन्यात परदेशातील विद्यापीठांना भारतात कँपस सुरू करण्यासाठी परवानगी देणार असल्याने परदेशी शिक्षणाचे दरवाजे सर्वसामान्य भारतीयांसाठीही खुले होऊ शकणार आहे. तसेच भारतीय विद्यापीठांनाही परदेशात कँपस सुरू करण्यसाठी परवानगी दिली जाणार आहे. (Foreign universities in India)
हा निर्णय झाल्यानंतर ऑक्सफर्ड, केंब्रिज, हार्वड अशा नामवंत विद्यापीठांचे कँपस भारतात सुरू होऊ शकणार आहेत.
खासगी विद्यापीठांतील शिक्षणाची गुणवत्ता राखण्यासाठीचे नियमही कठोर केले जाणार आहेत.
इकॉनॉमिक टाइम्सने ही बातमी दिली आहे.
शैक्षणिक शुल्क, अभ्यासक्रम, शिक्षक भरती यासाठी परदेशातील विद्यापीठांना चांगल्यापैकी अधिकार दिले जाणार आहेत. निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती भारतीय दूतावासाच्या माध्यमातून परदेशी विद्यापीठांना दिलीज जाणार आहे. तर भारतीय शिक्षण संस्थांना आणि विद्यापीठांना परेदशात कँपस सुरू करण्यासाठी परवानगी मिळणार असल्याने आयआयटीसारख्या संस्था परदेशात कँपस सुरू करू शकतील.
विद्यापीठ आयोगाचे चेअरमन जगदेश कुमार म्हणाले, "राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानेच नवे नियम केले जात आहेत. उच्च शिक्षणात जास्तीजास्त स्वायत्ता देताना गुणवत्तेची हमीही घेतली जाईल. एकूणच उच्च शिक्षणात फार मोठे सकारात्मक बदल होतील."
याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंगमध्ये किंवा नॅकमध्ये ठराविक रँकिंग असणारे विद्यापीठा परदेशातील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार आहेत.
हेही वाचा