नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : भारताने अलीकडेच ब्रम्होस क्षेपणास्त्राची विक्री करण्याच्या अनुषंगाने फिलिपीन्ससोबत करार केला आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर रविवारी फिलिपीन्स दौऱ्यावर रवाना झाले. 15 तारखेपर्यंत जयशंकर फिलिपीन्समध्ये राहणार असून प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय विषयांवर ते तेथील नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. फिलिपीन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटेरटे यांच्याशीही त्यांची भेट होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुमारे २९० किलोमीटर लांबवर मारा करणाऱ्या ब्रम्होस क्षेपणास्त्राची फिलिपीन्सला विक्री केली जाणार आहे. यासाठी ३७५ दशलक्ष डॉलर्सचा करार मागील जानेवारी महिन्यात दोन देशांदरम्यान करण्यात आला होता. फिलिपीन्सचे विदेश मंत्री टी. एल. डॉकसिन यांच्यासोबतची जयशंकर यांची भेटही महत्वपूर्ण मानली जात आहे. द्विपक्षीय संबंधांच्या संदर्भात दोन्ही देशांदरम्यान नोव्हेंबर २०२० मध्ये आभासी मार्गाने बैठक झाली होती. त्यानंतर जयशंकर यांचा हा दौरा होत आहे. राजधानी मनिला येथे जयशंकर तेथील भारतीय नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
हेही वाचलतं का?