Latest

Mumbai Pune Expressway Accident Updates : पाच मृतांपैकी चार जण मुंबईतील   

सोनाली जाधव

नवी मुंबई: पुढारी वृतसेवा; Mumbai Pune Expressway Accident Updates : 'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे' वर मोजे ढेकू गावापासून 37 किमी अंतरावर गुरूवारी (दि.१७) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणा-या इरटिगाने पुढे चालणा-या मोठ्या अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. (Mumbai Pune Expressway) या भीषण अपघातात पाच प्रवासी जागीच ठार झाले असून मृतांमध्ये मुंबईतील तीन तर कामोठे, नवी मुंबई येथील एका प्रवाशाचा समावेश आहे. तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ज

Mumbai Pune Expressway Accident Updates : खमींना खोपोली नगरपालिका रूग्णालयात आणि कामोठे एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमएच 14 ईसी 3501 असा या इरटिगाचा नंबर आहे. या प्रकरणी अस्पीया रईस यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी अस्पीया हे मित्र राहूल पांडे यांच्यासह सात अनोळखी प्रवाशांसह गुरूवारी रात्री इरटिगा गाडीतून चिंचवडहून मुंबईला निघाले होते. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते.  यावेळी बारा वाजण्याच्या सुमारास इरटिगा कार चालकाने भरधाव गाडी चालवत कारच्या पुढे चालणा-या एका अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महामार्गाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शुक्ला, एपीआय योगेश कदम, खोपोली पीआय शिरीष पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mumbai Pune Expressway Accident Updates : मयत प्रवासी 

1)वसीम साजिद काजी, वय 38 वर्ष, (रा. कुर्ला मुंबई)

2) राहुल सुरेशचंद्र पांडे, वय 30 वर्षे, (रा. कामोठे मुंबई)

3)अब्दुल रहमान खान कलीम अहमद खान, वय  32 वर्षे (रा. कुर्ला मुंबई)

4) आशुतोष नवनाथ गाडेकर,वय 23 वर्षे, (रा. अंधेरी मुंबई )

5)अनिल सुनील सानप वय 40 वर्षे, (रा. पुणे)

Mumbai Pune Expressway Accident Updates : जखमी प्रवासी

1)अमीर मोहम्मद हुसेन चौधरी, वय 35 वर्ष, रा कुर्ला मुंबई

2)भवरलाल खैरलाल वय 38 वर्ष रा अजमेर राजस्थान,

3)मच्छिंद्र अंकुश अंभोरे वय 40 वर्ष चिंचवड पुणे (चालक)

4) आसिया रहीस चौधरी, वय 25 वर्षे रा कुर्ला, मुंबई.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT