पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायमूर्ती एम. फातिमा बिवी यांचे वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. फातिमा बिवी सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या मुस्लिम महिला न्यायमूर्तीही होत्या. Fatima Beevi
फातिमा बिवी यांचा जन्म १९२७साळी केरळमध्ये झाला होता. वडिलांनी त्यांना कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. १९५०ला त्यांनी कायद्याची पदवी घेतली, यात त्यांना गोल्ड मेडल मिळाले होते. बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे गोल्ड मेडल मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. केरळमध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर १९७४ला त्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश झाल्या. १९८३ला त्यांची नेमणूक उच्च न्यायालयात झाली होती. Fatima Beevi
१९८९ला त्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाल्या. असा बहुमान मिळवणाऱ्या त्या भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिल्या महिला न्यायमूर्ती ठरल्या होत्या. १९९३ला त्या निवृत्त झाल्या. त्यानंतर त्या मानवी हक्क आयोगावर सदस्य होत्या. तसेच नंतर तामिळनाडूच्या राज्यपाल बनल्या. राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता.
हेही वाचा