Latest

NIA पथकावर हल्‍ला, प. बंगाल पोलिसांकडून NIA अधिकार्‍यांवरच गुन्‍हा दाखल!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर येथे एनआयए पथकावर झालेल्या हल्ल्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेले तृणमूल काँग्रेसचे नेते जाना यांच्या पत्नी मोनोब्रता जाना यांच्या तक्रारीवरून एनआयए टीम आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. NIA अधिकाऱ्यांनी घरात घुसून त्यांना मारहाण केली. अधिकाऱ्यांनी आपल्या सन्मानाचा अपमान केल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी भूपतीनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२५, ३४, ३५४, ३५४ (बी), ४२७, ४४८, ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?

2022 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासासाठी NAIचे पथक पूर्व मिदनापूरमधील भूपतीनगर भागात गेले होते. हे पथक आरोपींना अटक करून कोलकाता येथे आणत होते. यावेळी ग्रामस्थांनी एनआयए पथकाच्या ताफ्याला घेराव घातला आणि दगडफेक केली. या हल्ल्यात अनेक अधिकारी जखमी झाले. यावर स्‍थानिकांवर गुन्‍हा दाखल झाला आहे. ममता बॅनर्जींच्या राजवटीत पश्‍चिम बंगालमध्‍ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून हे सर्व पोलिसांच्या संगनमताने होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

ममता बॅनर्जी यांनी केली स्‍थानिकांची पाठराखण

राष्‍ट्रीय तपास संस्‍थेचे (NIA) पथक मेदिनीपूरमध्‍ये मध्यरात्रीनंतर छापा टाकण्यासाठी का आले?, विचित्र वेळेत छापे टाकण्यासाठी पथकाला आवश्यक परवानगी होती का, असे सवाल करत स्थानिक लोकांनी मध्‍यरात्री गावात अनोळखी व्यक्ती आल्यावर जे करायला हवे होते तेच केले, अशा शब्‍दांमध्‍ये पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी NIA पथकावर हल्‍ला करणार्‍या स्‍थानिकांची पाठराखण केली होती.

यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा संदर्भ देत ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या की, "निवडणुकीच्या आधी ते लोकांना का अटक करत आहेत? भाजपला वाटते की, ते प्रत्येक बूथ एजंटला अटक करतील? 'एनआयए'कडे काय अधिकार आहेत? हे सर्व भाजपला पाठिंबा देण्यासाठी केले जात आहे. भाजपच्या या घाणेरड्या राजकारणाविरुद्ध आम्‍ही लढा देत आहोत, असेही ममता बॅनर्जी म्‍हणाल्‍या होत्‍या.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT