amisha patel-Sunny Deol 
Latest

Gadar 2 Trailer : …अन्‌ सनी देओलला अश्रू अनावर तर अमिषा दिसली कूल (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : गदर २ च्या ट्रेलर लाँचवेळी अभिनेता सनी देओल भावूक होताना दिसला. प्रसारमाध्यमांशी बोलताना तो उत्सुकही दिसला. तर अभिनेत्री अमिषा पटेल कूल दिसला. ( (Gadar 2 Trailer)) मुसळधार पाऊस असूनही या कार्यक्रमात जमलेले मीडिया आणि चाहत्यांचे प्रेम पाहून अभिनेता भारावून गेला. जमावाने त्याच्यासाठी जल्लोष केला तेव्हा सनी देओल म्हणाला, "आप सबको ढेर सारा प्यार (तुम्हा सर्वांना खूप प्रेम). "सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांचे आभार मानू मानतो." सनी देओलला यावेळी अश्रूदेखील अनावर झाले. (Gadar 2 Trailer)

अभिनेता पुढे म्हणाला की, पावसात कार्यक्रम पुढे ढकलला जाण्याची भीती वाटत होती. तथापि, त्याच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमासाठी शहराच्या विविध भागांतून लोक जमलेले पाहून त्याला आश्चर्य वाटले. यावेळी तो चित्रपटाबाबत उत्सुक असलेलाही दिसला.

गदर २ चा ट्रेलर काल रात्री प्रदर्शित झाला. चित्रपटाचा मुख्य अभिनेता सनी देओलने इन्स्टाग्रामवर लिहिले की, "अपने परिवार और देश के लिए, एक बार फिर से गदर मचायेगा तारा सिंग (त्याच्या कुटुंबासाठी आणि देशासाठी, तारा सिंह काहीही करेल) कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने, तुम्हाला सादर करत आहे. सर्व गदर २ च्या ट्रेलरसह. ट्रेलर आता रिलीज झाला आहे. (गदर 2 या स्वातंत्र्यदिनी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे)."

(viralbhayani video)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT