दोहा (कतार); पुढारी ऑनलाईन : शुक्रवारी झालेल्या ग्रुप-जी गटातील सामन्यात ब्राझीलने स्वित्झर्लंडचा १-० ने पराभूत केले. या विजयाच्यामाध्यमातून ब्राझीलने उपात्यंपुर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. यापुर्वीच्या सामन्यात ब्राझीलने सर्बियाचा 2-0 असा पराभव केला होता. त्याचवेळी स्वित्झर्लंडने कॅमेरूनचा 1-0 असा पराभव केला होता. ब्राझील फिफा रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. तर स्वित्झर्लंडचा संघ 15 व्या क्रमांकावर आहे. (FIFA WC Brazil Vs Switzerland)
ब्राझीलने स्वित्झर्लंडला हरवून उपांत्यपुर्व फेरीत स्थान मिळवले. सामन्यातील एकमेव गोल ब्राझीलच्या कासेमिरोने 83 व्या मिनिटाला केला. या विजयासह ब्राझील उपांत्यपुर्व फेरीत दाखल होणारा दुसरा संघ ठरला. फ्रान्सने सर्वात प्रथम उपांत्यपुर्व फेरीत स्थान मिळवले होते. उपांत्यपुर्व फेरीत पोहचण्यासाठी आता स्वित्झर्लंडला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. स्वित्झर्लंडचा पुढील सामना 2 डिसेंबर रोजी सर्बियाविरुद्ध आहे. त्याचबरोबर त्याच दिवशी ब्राझीलचा संघ कॅमेरूनशी भिडणार आहे. ब्राझीलचे दोन सामन्यांत सहा गुण आहेत. तर स्वित्झर्लंडचे दोन सामन्यांमध्ये तीन गुण आहेत. (FIFA WC Brazil Vs Switzerland)
ब्राझीलने विश्वचषकातील शेवटचे 10 गोल हे उत्तरार्धात नोंदवले आहेत. स्वित्झर्लंड विरुद्ध ब्राझीलने 13 प्रयत्न केले. यापैकी पाच शॉट हे लक्ष्यावर होते. मात्र, ब्राझील संघाला एकच गोल करता आला. ब्राझीलचा चेंडूवरील ताबा 54 टक्के राहिला आहे. त्याच वेळी, स्विस संघाने केवळ सहा शॉट्सचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा एकही फटका निशाण्यावर नव्हता. स्वित्झर्लंडचा चेंडूवरील ताबा ४६ टक्के होता.
अधिक वाचा :