Latest

FIFA 2022 : फिफा विश्वचषकात पहिल्यांदाच अनोखी व्यवस्था, स्टेडियममध्ये बसवली वातानुकूलित यंत्रणा

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोव्हेंबरमध्ये २०२२ मध्ये जगभरात लोकप्रिय खेळ म्हणून प्रसिध्द असलेली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २१ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान कतारमध्ये खेळवली जाणार आहे. आखाती देशात फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याच्याआधी फिफा चषकाच्या इतिहासात आखाती देशात या स्पर्धेचे आयोजन केले गेले नव्हते. (FIFA 2022)

पहिल्यांदाच फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कतारमध्ये होत असल्यामुळे कतारही जगातील सर्व फुटबॉल चाहत्यांना एक अनोखा अनुभव देण्याच्या इराद्याने आयोजन  करत आहेत. त्यांनी त्यांच्या ८ स्टेडियममध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवली आहे. यासाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. (FIFA 2022)

वास्तविक, आखाती देशांमध्ये वाळवंट आहेत आणि यामुळेच येथील तापमान इतर देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत खेळाडू आणि प्रेक्षकांच्या सोयीसाठी स्टेडियममध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे.

ओपन एअर स्टेडियम वातानुकूलित करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. हे काम डॉ. कूल म्हणून ओळखले जाणारे यांत्रिक अभियंता डॉ. सौद गनी यांनी केले आहे. गनी यांच्या म्हणण्यानुसार, स्टेडियमच्या बाहेरचे तापमान ५२ अंश सेल्सिअस असेले तरी मैदानाच्याआतील तापमान २२ अंश सेल्सिअस राहील.

मोकळ्या वातानुकूलित मैदानात एसी कसा बसवणार?

डॉ. घनी यांनी सांगितले की, ओपन एअर स्टेडियमसाठी एअर कंडिशनिंग डिझाइन करणे हे मोठे आव्हान होते. उबदार हवा थंड हवेपेक्षा हलकी असते. उबदार हवा वर राहते तर थंड हवा खाली राहते. ते एका उदाहरणाने समजून घेवूया, जेव्हा एका ग्लासमध्ये पाणी आणि तेल ओतले जाते, तेव्हा तेल वर राहते कारण ते हलके असते. जड असल्याने पाणी स्थिर होते.

दरम्यान, काचेमध्ये पोहणारे मासे पाण्याच्या थंड पृष्ठभागाखाली राहतात. या सूत्राचा वापर आम्ही केला. यामुळे सामन्यात खेळाडू व स्टेडियममध्ये बसलेले लोकांना थंड मिळून त्यामुळे त्यांना उष्ण वातावरणाचा त्रास होणार नाही.

कसे केले?

गनी यांच्या म्हणण्यानुसार, चाचणी करताना सर्व गेट बंद करण्यात आले. खाली थंड हवेचा थर तयार झाला. वरील गरम हवा तेलासारखी आहे, परंतु आम्ही खाली असलेल्या थंड हवेचा पुनर्वापर करू, जेणेकरून वरील गरम हवा खालच्या थंड हवेत मिसळणार नाही. सुरुवातीला हे अशक्य वाटत होते, पण आता हे करण्यात आम्हाला यश मिळाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT