Sharing PAN Aadhaar On WhatsApp pudhari
फीचर्स

Sharing PAN Aadhaar On WhatsApp: तुम्हीही तुमचे पॅन, आधार कार्ड अन् बँक स्टेटमेंट WhatsApp वरून शेअर करता? ही बातमी तुमच्यासाठी

Anirudha Sankpal

Sharing PAN Aadhaar On WhatsApp: तुम्ही जर तुमचे पॅन, आधार कार्ड आणि बँकेचे स्टेंटमेंट व्हॉट्सअॅप वरून शेअर करत असाल तर सावधान. कारण तुम्ही बँक एजंट, प्रॉपर्टी ब्रोकर किंवा हॉटेल रिसेप्शनिस्टला व्हेरिफिकेशन करण्यासाठी पाठवलेली ही तुमची खासगी माहिती त्यांच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉप किंवा क्लाऊड बॅकअपवर जमसा होते आणि तिथूनच अडचणी सुरू होतात. त्या व्यक्ती जाणून बुजून तुमच्या डेटाचा गैरवापर करतील ही सर्वात मोठी भीती नाही तर तुम्ही ते डॉक्युमेंट सेंड केल्यानंतर त्याचं काय होतं ही आहे.

अनेक एजंट्स आणि रिसेप्शनिस्ट तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा बँक स्टेटमेंट डाऊनलोड करतात. त्यानंतर ती फाईल त्यांच्या पर्सनल डिवाईसला सेव्ह होते. त्याचबरोबर त्यांच्या क्लाऊड अकाऊंटवर आपोआप त्याचा बॅकअप देखील तयार होऊ शकतो.

जरी तो व्यक्ती कितीही प्रामाणिक असला तरी देखील तुमचे डॉक्युमेंट वर्षानुवर्षे तिथं पडून राहू शकतात. भविष्यात हँकिंग किंवा अकाऊंटमध्ये छेडछाड झाल्यावर तुमची माहिती त्यांच्या हाती लागू शकते. त्यानंतर ती माहिती पुन्हा एकदा शेअर होऊ शकते.

पर्सनल डिव्हाईसवर माहिती स्टोअर होणे चुकीचे

डिजिटल ट्रस्ट प्लॅटफॉर्म डिजिओचे को फाऊंडर आणि सीईओ अभिनव पराशर यांनी सांगितलं की, 'लोकांना वाटतं की ते कोणत्यातरी एजंटला किंवा हॉटेलला त्यांचे डॉक्युमेंट पाठवत आहेत. मात्र ते ती माहिती एका पर्सनल डिवाईसला पाठवत असतात. त्यामुळं आपल्या डेटावरील त्यांचा कंट्रोल पूर्णपणे निघून जातो.

अजून एक समस्या आहे. फायनान्स सेक्टरमध्ये डायरेक्ट सेलिंग एजंट्सचे एक मोठे नेटवर्क आहे. हे एजंट्स लेंडर्सला ग्राहक शोधण्यासाठी आणि त्यांना आपल्याशी जोडण्यासाठी मदत करतात. ज्यावेळी तुमची केवायसी डॉक्युमेंट एखाद्या संस्थेमार्फत किंवा अधिकृत सिस्टमऐवजी एखाद्या पर्सनल नंबरवरून गोळा केली जाते त्यावेळी अडचण निर्माण होते.

याद्वारे डेटा कंपन्या सामान्य सायबर सिक्युरिटी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाहेर जाऊ शकतात. तसेच त्या कागदपत्रांच्या अतिरिक्त कॉपी देखील तयार केल्या जाऊ शकतात. ही माहिती चुकीच्या माणसांच्या हातात पडल्यानंतर नको असलेले कॉल्स आणि मेसेज सुरू होतात. सर्वात वाईट म्हणजे यातून आयडेंटिटी थेफ्ट देखील होऊ शकते.

भारतात आता आर्थिक फ्रॉडची वाढती संख्या पाहता लोकांना आता सावध राहणे गरजेचे आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने २०२४-२५ च्या वर्षिक रिपोर्टमध्ये ३६ हजार कोटी रूपयांच्या बँकिंग फ्रॉडचे २३ हजार ९५३ प्रकरणे नोंदवली आहेत.

सुरक्षित पद्धत कोणती?

याचा अर्थ तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती शेअर करणं पूर्णपणे बंद करणे असा नाही. कर्जपुरवठादार, हॉटेल आणि इतर व्यासायिक कारणांसाठी नेहमी तुमची ओळख पटवणे गरजेचे असते.

योग्य मार्ग म्हणजे तुम्ही माहिती गोळा करण्याची पद्धत बदलण्यात यावील. पराशर यांनी सांगितलं की कंपन्यांनी फक्त डॉक्युमेंट गोळा करण्याऐवजी निवडक व्हेरिफिकेशनकडे वळलं पाहिजे.

कोणत्या व्यक्तीला व्हॉट्स अॅपवरून पॅन किंवा आधार कार्डची कॉपी पाठवण्यास सांगण्यापेक्षा आपला अधिकारी पाठवून किंवा आपल्या बिजनेस डिजिटल फॉर्मचा वापर केला जाऊ शकतो. या सिस्टम ऑटोमेटेड पद्धतीने तपास करू शकते.

हे डिजीलॉकर सारख्या प्लॅटफॉर्म किंवा युआयडीएआयच्या ऑफलाईन व्हेरिफिकेशन सिकिंग एंटिटी फ्रेमवर्कद्वारे देखील एखाद्या व्यक्तीच्या क्रेडेंशियल्सचे व्हेरिफिकेशन केले जाऊ शकते. यातील प्रमुख फरक म्हणजे हे व्हिरिफिकेशन एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल फोनचा वापर न करता एका व्यवस्थित सिस्टमद्वारे होते.

ज्यावेळी तुम्ही एखाद्या अधिकृत व्यवासय पोर्टलच्या माध्यमातून माहिती गोळा करत असला त्यावेळी ही माहिती कोण गोळा करत आहे आणि का हे स्पष्ट होतं. ज्यावेळी तुम्ही एखाद्या वैयक्तिक नंबरवर पीडीएफ पाठवता त्यावेळी त्या माहितीचे नियंत्रण करणे खूप अवघड होऊन जाते.

पॅन, आधार शेअर करण्यापूर्वी काय करावं?

ज्यावेळी तुम्ही कोणाच्या व्हॉट्सअॅपवर आपले पॅन कार्ड किंवा आधार, बँक स्टेटमेंट पाठवता त्यावेळी एक क्षण थांबा. तुम्ही कंपनीच्या अधिकृत लिंक किंवा सुरक्षित डॉक्युमेंट अपलोड पोर्टलची मागणी करा. जर त्या ऑर्गनायजेशनमध्ये माहिती गोळा करण्यासाठी पर्सनल नंबर ऐवजी सिस्टमचा वापर केला जात असेल त्याचा वापर करा. जर डॉक्युमेंट पाठवणं अत्यंत महत्वाचं असेल तर तो पासवर्डने सुरक्षित केलेल्या फाईलचा वापर करा आणि पासवर्ड वेगळा शेअर करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT