Anirudha Sankpal
व्हॉट्स ॲपने एन नवे भन्नाट फिचर आणलं आहे. त्यामुळं आता चॅटिंग सोपं होणार आहे.
ॲप ओपन करा
सर्वात आधी तुमचे व्हॉट्सॲप ओपन करून ज्या व्यक्तीचे मेसेज तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत, त्या चॅट बॉक्समध्ये जा.
मेसेज निवडा
तुम्हाला ज्या मेसेजचे भाषांतर हवे आहे, त्या मेसेजवर थोडा वेळ प्रेस करून (Select) ठेवा.
थ्री-डॉट्सवर क्लिक करा
स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर (Menu) क्लिक करा.
ट्रान्सलेट पर्याय निवडा
तिथे तुम्हाला 'Translate' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
भाषा निवडा
आता तुम्हाला ज्या भाषेत मेसेज वाचायचा आहे, ती भाषा मॅन्युअली निवडा किंवा 'ऑटोमॅटिक लँग्वेज डिटेक्शन' पॅक डाउनलोड करा.
भविष्यातील मेसेजेस
तुम्ही 'Translate all future messages' हा पर्याय निवडला तर त्या चॅटमध्ये येणारे सर्व मेसेजेस आपोआप तुमच्या भाषेत ट्रान्सलेट होतील.
मूळ भाषा कायम
विशेष म्हणजे, तुम्हाला मेसेज ट्रान्सलेट होऊन दिसत असले तरी, समोरच्या व्यक्तीला त्याचे मेसेजेस त्याच्या मूळ भाषेतच दिसतील.