Whatsapp चं भन्नाट View Once नावाचं फिचर वापरलं का? Pudhari Photo
तंत्रज्ञान

WhatsApp Context Card Feature : ग्रुपमध्ये अॅड करणाऱ्यांची ओळख समजणार

कॉन्‍टेक्‍स्‍ट कार्ड लाँच

sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी कॉन्‍टेक्‍स्‍ट कार्ड लाँच केले आहे.  हे फीचर फक्त व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये काम करेल. या फीचरद्वारे तुम्ही सदस्य असलेल्या सर्व ग्रुपशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकाल. जाणून घ्या व्हॉट्सअ‍ॅपचे कॉन्‍टेक्‍स्‍ट कार्ड काय आहे.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी नवे फिचर

आज सोशल मीडियामध्ये सर्वात लोकप्रिय कोणतं माध्यम असेल तर ते म्हणजे फेसबुकची मालकी असेलेले व्हॉट्सअ‍ॅप. व्हॉट्सअ‍ॅप युझर्सना नवनवीन नेहमी हटके आणि धमाकेदार फिचर देत असल्याने हल्ली त्याची लोकप्रियता वाढू लागली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी कॉन्‍टेक्‍स्‍ट कार्ड लाँच केले आहे. लवकरच ते सर्व युजर्ससाठी अपल्बध असणार आहे.

काय आहे कॉन्‍टेक्‍स्‍ट कार्ड फिचर?

जर तुम्हाला अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप युजर्सकडुन एखाद्या ग्रुपमध्‍ये जोडले तर कॉन्‍टेक्‍स्‍ट कार्ड त्‍या ग्रुपबाबत अधिक माहिती देईल. यामध्‍ये तुम्‍हाला ग्रुपमध्‍ये कोणी जोडले, ग्रुप कधी तयार करण्‍यात आला आणि कोणी तयार केला याबाबत माहिती मिळेल. त्‍यानंतर तुम्‍ही ग्रुपमध्‍ये राहायचे की ग्रुपमधून बाहेर पडायचे हे ठरवू शकता, तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर सुरक्षित राहण्‍यासाठी उपलब्‍ध असलेल्‍या काही सुरक्षित टूल्‍सचे पुनरावलोकन करू शकता. त्याच बरोबर तुम्‍हाला ग्रुप माहित आहे की नाही किंवा तुम्‍हाला ग्रुपमध्‍ये राहायचे आहे की नाही याबाबत खात्री देण्‍यास कॉन्‍टेक्‍स्‍ट कार्ड मदत करू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT