Samsung Galaxy Z Fold7 Canva
तंत्रज्ञान

Samsung Galaxy Z Fold7 | गॅलॅक्सी Z Fold7 आणि Flip7 सिरीजची भारतात विक्री सुरू; प्री-बुकिंगमध्येच मोडले सर्व विक्रम!

Samsung Galaxy Z Fold7 | भारतातील स्मार्टफोन बाजारात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या सॅमसंगच्या नव्या फोल्डेबल फोन्सची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

shreya kulkarni

Samsung Galaxy Z Fold7 launch In India

भारतातील स्मार्टफोन बाजारात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या सॅमसंगच्या नव्या फोल्डेबल फोन्सची प्रतीक्षा अखेर संपली आहे. सॅमसंगने आज फोल्डेबल स्मार्टफोन्स - गॅलॅक्सी Z Fold7, गॅलॅक्सी Z Flip7, गॅलॅक्सी Z Flip7 FE आणि गॅलॅक्सी वॉच8 सिरीजची विक्री भारतात सुरू केली आहे. आजपासून हे सर्व अत्याधुनिक डिव्हाईसेस तुमच्या जवळच्या रिटेल स्टोअर्समध्ये, तसेच Samsung.com, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत.

विशेष म्हणजे, या फोन्सना भारतीय ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला असून, प्री-ऑर्डरमध्ये त्यांनी नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. पहिल्या ४८ तासांतच २,१०,००० फोन्सची विक्रमी नोंदणी झाली, जी या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या गॅलॅक्सी S25 सिरीजच्या जवळपास आहे.

गॅलॅक्सी Z Fold7 आणि Z Flip7: आतापर्यंतचे सर्वात स्लिम आणि स्मार्ट!

सॅमसंगच्या सातव्या पिढीतील हे फोल्डेबल फोन्स केवळ दिसायला आकर्षक नाहीत, तर ते आतापर्यंतचे सर्वात पातळ, वजनाने हलके आणि AI ने सुसज्ज आहेत. हे स्मार्टफोन्स तुमच्या गरजा ओळखून रिअल-टाईममध्ये प्रतिसाद देतात.

मोठ्या स्क्रीनचा बादशाह - गॅलॅक्सी Z Fold7

  • यात आतापर्यंतचा सर्वात स्लीम आणि वजनाने हलका अनुभव मिळतो.

  • मोठ्या स्क्रीनमुळे गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा जबरदस्त अनुभव येतो.

  • यातील जेमिनी लाईव्ह (Gemini Live) या AI फीचरमुळे तुम्ही कॅमेऱ्यासमोर दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल, जसे की एखाद्या पदार्थाचा फोटो काढून, जवळच्या रेस्टॉरंटबद्दल थेट विचारू शकता.

  • २०० मेगापिक्सेलचा हाय-रिझोल्यूशन कॅमेरा व्यावसायिक दर्जाचे (Professional Quality) फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मदत करतो.

  • जनरेटिव्ह एडिट फीचरमुळे फोटोच्या बॅकग्राउंडमधील नको असलेल्या व्यक्तींना AI स्वतः ओळखून काढून टाकण्याची शिफारस करते.

स्टाईल आणि कॉम्पॅक्ट डिझाइनचा मिलाफ - गॅलॅक्सी Z Flip7

  • याचा आयकॉनिक फॉर्म आणि मोठी फ्लेक्सविंडो (FlexWindow) हे मुख्य आकर्षण आहे, ज्यामुळे फोन न उघडताच अनेक कामे करता येतात.

  • फ्लेक्सकॅमच्या (FlexCam) मदतीने जबरदस्त सेल्फी आणि सिनेमॅटिक व्हिडिओ काढता येतात.

  • यात 'पेट पोर्ट्रेट स्टुडिओ' (Portrait Studio for pets) नावाचे एक मजेशीर फीचर दिले आहे, जे तुमच्या पाळीव प्राण्याच्या कोणत्याही फोटोला एका कलाकृतीमध्ये बदलते.

गॅलॅक्सी वॉच 8 सिरीज: आरोग्य आणि आरामदायीपणाचा उत्तम संगम

नवीन स्मार्टफोन्ससोबतच सॅमसंगने गॅलॅक्सी वॉच8 आणि गॅलॅक्सी वॉच8 क्लासिक ही स्मार्टवॉचेस लॉन्च केली आहेत.

  • यातील बायोॲक्टिव्ह सेन्सरच्या (BioActive Sensor) मदतीने झोप, तणाव, पोषण आणि व्यायामावर रिअल-टाईममध्ये लक्ष ठेवता येते.

  • अत्यंत स्लिम कुशन डिझाइनमुळे हे घड्याळ दिवसभर हातात घालण्यासाठी आरामदायक आहे.

  • यामध्ये पहिल्यांदाच 'अँटीऑक्सिडंट इंडेक्स' (Antioxidant Index) हे फीचर देण्यात आले आहे, जे फक्त ५ सेकंदात शरीरातील कॅरोटीनॉइडची पातळी मोजते आणि निरोगी आयुष्यासाठी मार्गदर्शन करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT