तंत्रज्ञान

Oppo A6 Max Launch : 7000mAh बॅटरीचा स्वस्त फोन! पाण्यात पडल्यावरही होणार नाही खराब

Oppo new mobile Launch : फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर, 32MP चा दमदार फ्रंट कॅमेरा

पुढारी वृत्तसेवा

स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo ने नुकताच आपला नवीन स्मार्टफोन Oppo A6 Max लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 7000 mAh बॅटरी आणि अनेक आकर्षक फीचर्सचा भरणा आहे. विशेष म्हणजे, हा फोन IP66, IP68 आणि IP69 रेटिंगसह येतो, ज्यामुळे तो पाणी आणि धुळीपासून पूर्णपणे सुरक्षित आहे, असे कंपनीने सांगितले आहे.

मागील वर्षी लॉन्च झालेल्या Oppo A5 चे हे अपग्रेडेड मॉडेल आहे. हा फोन निळा आणि पांढरा अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. याच्या मागील बाजूस Find X8 सीरीजप्रमाणे गोलाकार कॅमेरा सेटअप दिला आहे, जो फोनला एक प्रीमियम लुक देतो.

Oppo A6 Max ची किंमत आणि उपलब्धता

Oppo A6 Max 8GB RAM आणि 256GB अशा एकाच स्टोरेज वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत CNY 1599 (जवळपास 23,500 रुपये) आहे. सध्या हा फोन फक्त चीनमध्ये लॉन्च झाला असून, कंपनीने तो आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केलेला नाही. MobileDokan या वेबसाइटवर या फोनची किंमत आणि फीचर्सची माहिती समोर आली आहे.

दमदार फीचर्सने सुसज्ज Oppo A6 Max

Oppo A6 Max मध्ये 6.8 इंचाचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 1280 x 2800 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या हाय रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि तो क्रिस्टल शील्ड ग्लासने सुरक्षित आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसर वापरण्यात आला आहे, जो दमदार परफॉर्मन्स देतो.

फीचर आणि माहिती

  • डिस्प्ले : 6.8 इंच OLED, 120Hz

  • प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 7 Gen 3

  • स्टोरेज : 8GB RAM, 256GB स्टोरेज

  • बॅटरी : 7000mAh, 80W फास्ट चार्जिंग

  • कॅमेरा : बॅक-50MP + 2MP, फ्रंट-32MP

  • ऑपरेटिंग सिस्टीम : Android 15 (ColorOS)

या फोनमध्ये 5200mm2 चा वेपर चेंबर (Vapor Chamber) आहे, ज्यामुळे तो जास्त गरम होत नाही. तसेच, यामध्ये डुअल-बँड वायफाय (Dual-band WiFi), 5G, जीपीएस आणि NFC सारखी अत्याधुनिक फीचर्स उपलब्ध आहेत.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, यात मागील बाजूस 50MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा असलेला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा दमदार फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन Android 15 वर आधारित ColorOS वर चालतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT