Google Search Warning : सावधान! गुगलवर ‘हे’ शब्द शोधताय... तुमच्यावर होऊ शकते कारवाई

इंटरनेट वापरताना सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
google search warning
Published on
Updated on

मुंबई : गुगलवर सहज काहीतरी शोधण्याची सवय तुम्हाला मोठ्या कायदेशीर अडचणीत आणू शकते. तुमच्या प्रत्येक सर्चवर सायबर पोलिसांची नजर असून, काही विशिष्ट आणि संशयास्पद शब्द शोधल्यास तुमच्याविरुद्ध ते पुरावा म्हणून वापरले जाऊ शकतात आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.

तपास यंत्रणा तुमच्या गुगल सर्च हिस्ट्रीचा डेटा तपासू शकते. त्यामुळे इंटरनेट वापरताना सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी पुढील बाबींबाबत सर्च टाळा.

google search warning
Google Boy Kautilya | ‘गुगल बॉय’ कौटिल्यला 25 लाखांची शिष्यवृत्ती

यामध्ये बॉम्ब बनवण्याच्या पद्धती किंवा हत्यारांची माहिती शोधणे हा गंभीर गुन्हा आहे. तसेच ड्रग्ज किंवा इतर अमली पदार्थांशी संबंधित माहिती शोधल्यास कायद्यानुसार कडक कारवाई होऊ शकते.

याशिवाय बाल लैंगिक शोषण किंवा इतर कोणत्याही प्रतिबंधित कंटेंटबद्दल सर्च केल्यास शिक्षा आणि दंड होऊ शकतो. जर तुम्ही कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा संस्थेविरुद्ध अपमानास्पद किंवा द्वेषपूर्ण माहिती शोधत असाल तर ते सायबर गुन्ह्याच्या श्रेणीत येते.

google search warning
Whatsapp देणार Google Meet, Zoomला टक्कर, व्हॉट्सॲपमध्ये 'शेड्यूल कॉल्स' फीचरची धमाकेदार एंट्री

महत्त्वाचे म्हणजे बनावट नोटा, बँकिंग फ्रॉड किंवा हॅकिंगच्या शोधलेल्या युक्त्या तुम्हाला थेट कारागृहाची वारी घडवू शकतात. अनेकदा केवळ कुतूहलापोटी केलेल्या सर्चमुळेही लोकांना कारवाईला सामोरे जावे लागले आहे.

लक्षात ठेवा, इंटरनेटचा वापर माहिती आणि ज्ञानासाठी करा. कारण एक चुकीचा सर्च तुमच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो.

google search warning
Perplexity AI big tech news: टेक विश्वात खळबळ! Google क्रोम विकत घेण्यासाठी AI स्टार्टअप Perplexityची 34.5 अब्ज डॉलर्सची बोली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news