Meta Meta layoffs news  
तंत्रज्ञान

Meta AIमध्ये मोठी नोकरकपात; 'सुपरइंटेलिजन्स लॅब'मधील 600 कर्मचाऱ्यांना कंपनीने दिला नारळ

Meta AI Tech job cuts: काही महिन्यांपूर्वीच मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी अब्जावधी डॉलर्स खर्च करून 'Meta AI'ची टीम तयार केली होती

मोनिका क्षीरसागर

टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मेटा (Meta) ने आपल्या महत्त्वाकांक्षी 'AI सुपरइंटेलिजेंस' (AI Superintelligence) प्रकल्पावर काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांची नोकरीवरून कपात केली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कंपनीने आपल्या AI विभागातून सुमारे ६०० कर्मचाऱ्यांच्या हाती नारळ दिला आहे.

काही महिन्यांपूर्वीच मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी अब्जावधी डॉलर्स खर्च करून ही टीम तयार केली होती. कंपनीचे मुख्य AI अधिकारी अलेक्झांडर वांग (Alexandr Wang) यांनी पाठवलेल्या अंतर्गत मेमो (Internal Memo) नंतर हा निर्णय समोर आला आहे.

वांग यांनी स्पष्ट केले आहे की, “आमचा उद्देश निर्णय प्रक्रिया अधिक जलद करणे आणि टीमला अधिक सक्षम बनवणे आहे. कमी लोकांसह, कमी चर्चांमध्ये निर्णय घेतले जातील आणि प्रत्येक सदस्य अधिक जबाबदारी घेईल.” कंपनीने या निर्णयाला खर्चात कपात किंवा प्रकल्पातून माघार घेण्याचे संकेत न देता, एक “कार्यक्षमतेसाठी उचललेले पाऊल” (efficiency move) असे म्हटले आहे.

आक्रमक भरतीनंतर Meta कडून कर्मचारी कपातीचा निर्णय

मेटाने ॲपल (Apple), ओपनएआय (OpenAI) आणि अँथ्रॉपिक (Anthropic) सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांमधून उच्च स्तरावरील प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी केलेल्या आक्रमक भरतीनंतर अवघ्या काही महिन्यांतच कर्मचारी कपात करण्यात आली आहे. तरीही, कंपनीने प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांना इतर विभागांमध्ये पदांसाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित केले आहे आणि म्हटले आहे की, ते प्रमुख AI पदांसाठी निवडक भरती सुरूच ठेवणार आहेत. विशेष म्हणजे, मेटाची नवीन 'TBD लॅब' (TBD Lab) या छटणीतून वगळण्यात आली आहे, तर तिच्या अनेक सर्वाधिक पगार घेणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांचा समावेश याच विभागात आहे.

ड्रीम प्रोजेक्टसाठी पाण्यासारखा पैसा

मेटाला आपल्या ड्रीम प्रोजेक्टसाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे. आपल्या सुपर इंटेलिजेंस प्रकल्पाला गती देण्यासाठी कंपनीने वांग यांच्या नेतृत्वाखालील डेटा लेबलिंग स्टार्टअप, स्केल एआय (Scale AI) मध्ये तब्बल १.२ लाख कोटी (१४.३ बिलियन डॉलर्स) इतका मोठा गुंतवणूक केली आहे. अहवालांमधून हे देखील समोर आले आहे की, मेटाने प्रतिस्पर्धी कंपन्यांमधून AI तज्ञांना आपल्याकडे वळवण्यासाठी ८०० कोटीपर्यंतचे (१०० मिलियन डॉलर्स) मोठे वेतन पॅकेज (Salary Packages) देऊ केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT