Cyber Security Alert India 
तंत्रज्ञान

Cyber Security Alert| ॲन्ड्रॉइड युजर्ससाठी भारत सरकारचा 'हाय अलर्ट'! बचावासाठी 'या' गोष्टी लगेच करा

Smartphone Security Tips : हॅकर्स तुमचा फोन कधीही हॅक करून तुमचा डेटा चोरू शकतात किंवा फोनवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात, त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे

मोनिका क्षीरसागर

Hacker Attack Android Cyber Security Alert India

भारत सरकारच्या सायबर सुरक्षा टीम CERT-Inने (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) ॲन्ड्रॉइड फोन वापरणाऱ्या लाखो युजर्ससाठी उच्च-धोक्याची (High-Risk) चेतावणी जारी केली आहे.

ॲन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये गंभीर त्रुटी (vulnerabilities) आढळल्या आहेत, ज्यामुळे हॅकर्स तुमचा फोन हॅक करून तुमचा डेटा चोरू शकतात किंवा फोनवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात. हा अलर्ट नोव्हेंबर २०२५ मध्ये जारी करण्यात आला असून त्याचा क्रमांक CIVN-2025-0293 आहे.

कोणत्या ॲन्ड्रॉइड व्हर्जनला धोका?

हा धोका प्रामुख्याने ॲन्ड्रॉइड व्हर्जन 13, 14, 15 आणि 16 वापरणाऱ्या डिव्हाईसेसना आहे. याचा अर्थ, बहुतेक नवीन स्मार्टफोन आणि टॅब्लेट या धोक्याच्या कक्षेत येतात.

धोक्यात असलेले ब्रँड्स

सॅमसंग (Samsung), वनप्लस (OnePlus), शाओमी (Xiaomi), रियलमी (Realme), मोटोरोला (Motorola), वीवो (Vivo), ओपो (Oppo) आणि गूगल पिक्सल (Google Pixel) यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सचे फोन धोक्यात असल्याचे देखील CERT-Inने (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) सांगितले आहे.

इतर डिव्हाईसेस

स्मार्टफोन व्यतिरिक्त, चिपसेट उत्पादक (उदा. Qualcomm, MediaTek) यांच्याशी संबंधित कमजोर्यांमुळे स्मार्ट टीव्ही, वेअरेबल्स आणि इंटरनेटशी जोडलेले इतर डिव्हाईसेस देखील हॅकर्सच्या नियंत्रणात येऊ शकतात.

धोका निर्माण होण्याचे कारण काय?

गूगलच्या नोव्हेंबर २०२५ च्या सुरक्षा बुलेटिनमध्ये नमूद केलेल्या, ॲन्ड्रॉइड सिस्टीममधील अनेक कमजोर्यांमुळे हा धोका वाढला असल्याचे भारत सरकारच्या सायबर सुरक्षा टीमने स्पष्ट केले आहे.

धोक्याचे स्वरूप आणि परिणाम

या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स खालीलप्रमाणे गंभीर नुकसान करू शकतात:

  • डेटा चोरी: तुमचे खासगी फोटो, मेसेजेस, बँक खात्याचे तपशील (Bank Details) आणि इतर आर्थिक माहिती चोरली जाऊ शकते.

  • पूर्ण नियंत्रण: हॅकर्स तुमच्या फोनवर पूर्ण नियंत्रण मिळवून कोणताही दुर्भावनापूर्ण (malicious) कोड चालवू शकतात किंवा धोकादायक ॲप्स इन्स्टॉल करू शकतात.

  • सिस्टीम बिघाड: तुमचा क्लाउड डेटा (उदा. गूगल ड्राईव्ह, ईमेल) हॅक होऊ शकतो किंवा संपूर्ण फोन सिस्टीम खराब होऊ शकते.

  • रिमोट कंट्रोल: फोनला रिमोटने नियंत्रित करून गैरवापर केला जाऊ शकतो.

या धोक्यापासून बचाव कसा करावा?

CERT-Inने या गंभीर धोक्यापासून वाचण्यासाठी खालील सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत:

1. तातडीने अपडेट करा

सर्वात महत्त्वाचे: डिव्हाईस निर्मात्यांकडून (उदा. Samsung, Xiaomi, Google) किंवा Google कडून उपलब्ध झालेले नवीनतम सुरक्षा अपडेट (Latest Security Update), विशेषतः नोव्हेंबर २०२५ चा पॅच, येताच लगेच इन्स्टॉल करा.

सेटिंग्जमध्ये जाऊन अपडेट तपासा आणि ते त्वरित इन्स्टॉल करा.

ऑटोमॅटिक अपडेट्स (Automatic Updates) नेहमी ऑन ठेवा.

2. सुरक्षित ॲप्स वापरा:

फक्त गूगल प्ले स्टोअरवरून (Google Play Store) ॲप्स डाउनलोड करा.

अनोळखी किंवा थर्ड-पार्टी (Third-party) स्त्रोतांकडून ॲप्स डाउनलोड करणे टाळा.

3. प्ले प्रोटेक्ट (Play Protect) ऑन ठेवा:

गूगल प्ले प्रोटेक्ट (Google Play Protect) नेहमी 'ऑन' ठेवा. हे फीचर धोकादायक ॲप्स स्कॅन करते.

ॲन्ड्रॉइड युजर्संनी अशी सावधानता बाळगा

ईमेल किंवा मेसेजमध्ये आलेल्या संशयास्पद लिंक्स (Suspicious Links) किंवा अटॅचमेंट्स उघडू नका. यातून तुमच्या फोनमध्ये व्हायरस येऊ शकतो. वेळेवर अपडेट करणे हेच या धोक्यापासून वाचण्याचे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT