Panchayat Season 4 AI Image
तंत्रज्ञान

आता फ्रीमध्ये पाहा! 'Panchayat Season 4' Jio आणि Airtel युजर्ससाठी आनंदाची बातमी

फुलेरा गावचे सचिवजी, प्रधानजी आणि त्यांचे भन्नाट किस्से पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

shreya kulkarni

Panchayat Web Series India

फुलेरा गावचे सचिवजी, प्रधानजी आणि त्यांचे भन्नाट किस्से पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'पंचायत' या प्रचंड लोकप्रिय वेब सिरीजचा चौथा सीझन नुकताच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे आणि तो पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण तुमच्याकडे प्राइमचं सबस्क्रिप्शन नाहीये? काळजी करू नका! आता तुम्ही एक रुपयाही अतिरिक्त खर्च न करता 'पंचायत ४'चा आनंद घेऊ शकता.

एअरटेलच्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स

जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी काही उत्तम प्लॅन्स आहेत. ₹1199 च्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांसाठी दररोज २.५ जीबी डेटासोबत अॅमेझॉन प्राइमचं सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत मिळतं. याशिवाय, ₹999 किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचा ब्रॉडबँड प्लॅन वापरत असाल, तर तुम्हाला प्राइम व्हिडिओसोबतच डिज्नी+ हॉटस्टारचंही सबस्क्रिप्शन मोफत मिळेल.

जिओनेही आणले आहेत खास प्लॅन्स

जिओनेही आपल्या ग्राहकांना निराश केलेलं नाही. जिओच्या ₹1029 च्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला प्राइम लाइटचं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं. तसेच, जर तुम्ही जिओफायबर वापरत असाल, तर ₹1299 पासून सुरू होणाऱ्या अनेक ब्रॉडबँड प्लॅन्समध्ये अॅमेझॉन प्राइमचं सबस्क्रिप्शन मोफत दिलं जात आहे.

थोडक्यात, आता फक्त एका रिचार्जमध्ये तुम्हाला डेटा, कॉलिंग आणि मनोरंजनाचा पूर्ण पॅकेज मिळत आहे. त्यामुळे, वेगळं सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. फक्त तुमचा योग्य प्लॅन निवडा आणि घरबसल्या 'पंचायत ४'चा मनसोक्त आनंद घ्या!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT