iPhone खरेदी करताना अनेकदा ग्राहक फसवणुकीला बळी पडतात. बाजारात आज नकली iPhones मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून ते खऱ्या iPhoneसारखेच दिसतात. त्यामुळे थोडीशीही चूक तुमच्या हजारो रुपयांचं नुकसान करू शकते. विशेषतः अनधिकृत दुकानदारांकडून किंवा ऑनलाइन थर्ड पार्टी सेलर्सकडून खरेदी करताना फसवणुकीची शक्यता अधिक असते. अशा वेळी खाली दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स तुमच्या कामी येतील.
1. बॉक्स आणि पॅकेजिंग तपासा:
खऱ्या iPhone चं पॅकेजिंग नेहमीच प्रीमियम असतं. बॉक्सवर Apple चं लोगो चमकदार आणि स्पष्ट असतो. नकली फोनच्या बॉक्सची क्वालिटी साधारण आणि कमी दर्जाची असते.
2. सीरियल नंबर Apple वेबसाइटवर चेक करा:
प्रत्येक खऱ्या iPhone ला एक युनिक सीरियल नंबर असतो. तो Apple च्या https://checkcoverage.apple.com या वेबसाईटवर टाकून सत्यता तपासता येते. नकली फोनमध्ये चुकीचा किंवा बनावट नंबर असतो.
3. बिल्ट क्वालिटीमध्ये फरक ओळखा:
iPhone हा दर्जेदार मटेरियलने बनवलेला असतो. नकली फोनमध्ये प्लास्टिकसारख्या स्वस्त मटेरियलचा वापर असतो, त्यामुळे फोन हातात घेतल्यानंतरच तो बनावट असल्याचे ओळखून येते.
4. ऑपरेटिंग सिस्टम लक्षात घ्या:
iPhone मध्ये फक्त iOS प्रणालीच असते. नकली फोनमध्ये Android सिस्टिम वापरून ती iOS सारखी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.
5. कॅमेरा तपासा:
खऱ्या iPhone चा कॅमेरा अतिशय स्पष्ट फोटो देतो. नकली फोनचा कॅमेरा फोटो पाहिल्यावर ब्लर क्वालिटी दर्शवतो.
6. किंमत खूपच कमी असेल तर सावध व्हा:
खऱ्या iPhone ची एक ठराविक किंमत रेंज असते. ती किंमत जर खूप कमी वाटत असेल, तर तो फोन नकली असण्याची शक्यता जास्त आहे.