VIP Mobile Number Canva
तंत्रज्ञान

VIP Mobile Number | VIP मोबाईल नंबर हवा आहे? 'या' सोप्या पद्धतीचा करा वापर जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप गाइड!

VIP Mobile Number | आजच्या युगात मोबाईल नंबर फक्त एक आकडा राहिलेला नाही, तर ती एक तुमची ओळख बनली आहे.

पुढारी वृत्तसेवा

How To Get VIP Number

आजच्या युगात मोबाईल नंबर फक्त एक आकडा राहिलेला नाही, तर ती एक तुमची ओळख बनली आहे. त्यामुळे अनेक लोक आपल्यासाठी सामान्य नंबरऐवजी व्हीआयपी (VIP) किंवा फॅन्सी नंबर घेऊ इच्छितात. असा नंबर लक्षात ठेवणे सोपे असते आणि तो इतरांपेक्षा वेगळा दिसतो. चांगली बातमी अशी आहे की, जिओ (Jio), वोडाफोन-आयडिया (Vi) आणि बीएसएनएल (BSNL) सारख्या कंपन्या आपल्या ग्राहकांना असा नंबर निवडण्याची संधी देतात. जर तुम्हालाही तुमच्यासाठी एक व्हीआयपी नंबर घ्यायचा असेल, तर त्याची सोपी प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

जिओ (Jio) चा VIP नंबर कसा घ्याल?

जिओचा व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठीची प्रक्रिया खूप सोपी आहे.

  1. सर्वात आधी गुगलवर 'Jio VIP number' असे सर्च करा.

  2. सर्च रिझल्टमध्ये जिओच्या अधिकृत लिंकवर क्लिक करा.

  3. या लिंकवर तुम्हाला तुमचा सध्याचा मोबाईल नंबर आणि ओटीपी (OTP) विचारला जाईल.

  4. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या सध्याच्या नंबरशी मिळतेजुळते काही फॅन्सी नंबर दिसतील.

  5. या यादीतून तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही नंबर निवडू शकता.

व्होडाफोन-आयडिया (Vi) चा VIP नंबर कसा घ्याल?

जिओप्रमाणेच व्होडाफोन-आयडियाचा व्हीआयपी नंबर घेणे देखील सोपे आहे.

  1. गुगलवर 'VI VIP number' असे सर्च करा.

  2. सर्च रिझल्टमध्ये दिसणाऱ्या व्होडाफोन-आयडियाच्या लिंकवर क्लिक करा.

  3. येथेही तुम्हाला तुमचा सध्याचा नंबर आणि ओटीपी टाकावा लागेल.

  4. त्यानंतर तुम्हाला तुमच्याशी संबंधित काही खास नंबर दाखवले जातील.

  5. या यादीतून तुम्ही तुमच्या आवडीचा नंबर निवडू शकता.

बीएसएनएल (BSNL) चा VIP नंबर कसा घ्याल?

बीएसएनएल आपल्या ग्राहकांना व्हीआयपी नंबर निवडण्यासाठी काही वेगळी प्रक्रिया आहे.

  1. बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

  2. येथे ‘Choose Your Mobile Number’ (तुमचा मोबाईल नंबर निवडा) या पर्यायावर टॅप करा.

  3. आता तुमचा प्रदेश (झोन) आणि राज्य निवडा.

  4. येथे तुम्हाला विविध फिल्टर वापरून नंबर शोधण्याचा पर्याय मिळेल. तुम्ही सिरीज (series), सुरुवातीचा नंबर किंवा शेवटचा नंबर यांसारखे फिल्टर वापरून नंबर शोधू शकता.

  5. यादीतील तुमच्या आवडीचा नंबर तुम्ही आरक्षित (Reserve) करू शकता.

एअरटेल (Airtel) ची सुविधा

जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलप्रमाणे एअरटेल (Airtel) आपल्या ग्राहकांना थेट वेबसाइटवरून फॅन्सी नंबर निवडण्याची सुविधा देत नाही. जर तुम्हाला एअरटेलचा व्हीआयपी नंबर हवा असेल, तर त्यासाठी तुम्ही त्यांच्या जवळच्या स्टोअरमध्ये जाऊन माहिती घेऊ शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT