Google Desctop mode  File Photo
तंत्रज्ञान

Google घेऊन येतंय धमाकेदार फिचर; आता खिशात फोन नाही, तर 'कंप्युटर'

Google Desctop mode | Google I/O 2025 परिषदेत कंपनी नवीन फिचरची घोषणा करणार

मोनिका क्षीरसागर

सॅमसंग आणि मोटोरोला या मोबाईल कंपन्यांप्रमाणेच गुगल (Google) देखील एक उपयुक्त फिचर लवकरच आणत आहे. गुगलचे हे वैशिष्ट्य तुमच्या स्मार्टफोनला संगणकात (Computer) रूपांतरित करेल. ज्यामुळे युजर्संना लवकरच मोबाईल स्क्रीनवर कंप्युटरसारखा इंटरफेस वापरता येणार आहे.

Google I/O 2025 परिषदेत घोषणा?

टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी Google ची वार्षिक डेव्हलपर परिषद Google I/O २० मे रोजी सुरू होणार असून २१ मे पर्यंत चालणार आहे. जगभरात तंत्रज्ञानप्रेमींमध्ये याची उत्सुकता वाढत चालली आहे. या परिषदेत कंपनी अँड्रॉइड 16 सह Google-AI मॉडेल जेमिनीशी (Gemini) संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा करेल. याशिवाय गुगल क्रोम , गुगल सर्च आणि युट्यूबबाबतही मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. तसेच गुगल मोबाईलमध्ये डेस्कटॉप मोड नावाचं फिचर आणणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

हेही वाचा:

'या' मोबाईल कंपन्या देतात 'डेस्कटॉप मोड' सेवा

Google आपल्या Android ऑपरेटिंग सिस्टममध्ये एक भन्नाट आणि अत्यंत उपयुक्त फीचर घेऊन येण्याच्या तयारीत आहे. हे फिचर इतकं ताकदवान आहे की, तुमचा स्मार्टफोन एक मिनी कंप्युटरमध्ये रूपांतरित होणार आहे. सध्या सॅमसंग आणि मोटोरोला DeX आणि Motorola Smart Connect यासारख्या डेस्कटॉप मोडच्या सेवा देतात. आता गुगलही याच पावलावर पाऊल ठेवणार आहे.

नेमकं काय आहे Desktop Mode?

सॅमसंगचा Dex Mode आणि मोटोरोलाचा Smart Connect यांसारख्याच संकल्पनेवर आधारित, Google देखील आता Android सिस्टीममध्ये Desktop Mode नावाचे फीचर समाविष्ट करणार आहे. या मोडमध्ये, फोन HDMI किंवा USB-C द्वारे मॉनिटरशी कनेक्ट केला की तुमच्यासमोर एक डेस्कटॉपसारखा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये मल्टी-विंडो सपोर्ट, फुल स्क्रीन अ‍ॅप्स, ड्रॅग-अ‍ॅन्ड-ड्रॉप फाइलिंग आणि कीबोर्ड आणि माऊस देखील वापरता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा:

Googleच्या 'या' फिचरमध्ये काय असेल खास ?

Google च्या Desktop Mode फिचरबद्दल समोर येत असलेल्या माहितीनुसार, गुगल या फिचरला 'डेस्कटॉप मोड' असे नाव देईल. मल्टीटास्किंग वैशिष्ट्यांसह, त्यात विंडोजचा आकार वाढण्याची सुविधा देखील असेल. याशिवाय ते Chrome OS सारखे दिसेल असेही म्हटले जातंय. क्रोम ओएस (Chrome OS) ही गुगलची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम आहे, जी ते गुगलच्या क्रोमबुकमध्ये वापरते. हे मोबाईलच्या अँड्रॉइड आणि पीसीच्या विंडोज ओएसमधील मानले जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, हा मोड वापरण्यासाठी फोनला वायरद्वारे स्क्रीनशी जोडावे लागेल. त्याचवेळी, काही अहवाल असे म्हटले आहे की, गुगल या वैशिष्ट्यासह वायरलेस कनेक्शनसाठी देखील समर्थन देऊ शकते. टेक तज्ञ असेही म्हणतात की, इतर अँड्रॉइड फोनवर येण्यापूर्वी गुगल त्यांच्या पिक्सेल डिव्हाइसवर हे वैशिष्ट्य उपलब्ध करून देऊ शकते.

'हे' फिचर कधी येणार आहे?

Google ने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु Android 15 च्या बीटा व्हर्जनमध्ये याचे संकेत मिळाले आहेत. 2025 च्या उत्तरार्धात हे फीचर अधिकृतपणे सादर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

कसे वापरता येईल?

  • स्मार्टफोनमध्ये Android 15 किंवा पुढील आवृत्ती असणे आवश्यक

  • USB-C केबलद्वारे स्क्रीनशी कनेक्ट करणे

  • प्लग अँड प्ले पद्धतीने इंटरफेस सुरू होणार

  • कीबोर्ड-माऊस वापरून संगणकासारखा अनुभव

Googleचे 'हे' फिचर का आहे खास?

आजच्या युगात अनेकांना लॅपटॉप/पीसी ची गरज असते, पण सर्वांकडे त्याची सोय नसते. अशावेळी मोबाईलच जर कंप्युटर सारखे वागले, तर काम करणं अधिक सुलभ होणार. या फीचरमुळे वर्क फ्रॉम होम, फ्रीलान्सिंग किंवा प्रवासादरम्यान काम करणाऱ्या कंप्युटर युजर्संना प्रचंड फायदा होणार आहे, असेही टेक तज्ज्ञांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT