Google I/O 2025 
तंत्रज्ञान

Google I/O 2025: गूगल आपल्या डिजिटल युगात काय बदल घडवणार?

Google I/O 2025 चे आयोजन 20 आणि 21 मे रोजी माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया येथील शोरलाइन अॅम्फीथिएटरमध्ये होणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

गूगलचा बहुप्रतीक्षित आणि वर्षातील सर्वात मोठा टेक इव्हेंट Google I/O 2025 आजपासून सुरू होत आहे. नेहमीप्रमाणे यंदाही गूगल आपल्या वापरकर्त्यांसाठी, डेव्हलपर्ससाठी आणि तंत्रज्ञानप्रेमींसाठी अनेक मोठे अपडेट घेऊन येणार आहे.

हा कार्यक्रम म्हणजे गूगलच्या भविष्यातील तंत्रज्ञानाचं दर्शन घडवणारी एक झलक असते, जिथे कंपनी आपल्या नव्या उत्पादने, सॉफ्टवेअर अपडेट्स, AI वैशिष्ट्ये आणि डिजिटल इकोसिस्टमच्या पुढच्या टप्प्याची ओळख करून देते.

इव्हेंट कुठे आणि कधी?

Google I/O 2025 चे आयोजन 20 आणि 21 मे रोजी माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया येथील शोरलाइन अॅम्फीथिएटरमध्ये होणार आहे. भारतातील प्रेक्षकांसाठी या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आज, 20 मे रोजी रात्री 10:30 वाजता सुरू होईल.

हा कार्यक्रम तुम्ही घरबसल्या पाहू शकता:

  • गूगलच्या अधिकृत YouTube चॅनेलवर

  • [Google I/O च्या अधिकृत वेबसाइटवर](https://io.google)

Google I/O 2025

इव्हेंटमध्ये काय असणार खास?

Gemini AI चा नवा अवतार

या वर्षी सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा विषय म्हणजे गूगलचं AI मॉडेल Gemini. नवीन वर्जन पूर्वीपेक्षा अधिक वेगवान, बुद्धिमान आणि युजर-फ्रेंडली असण्याची शक्यता आहे. Gemini आता कोड लिहू शकणार, इंटरनेटवर रिसर्च करू शकेल आणि युजर्सच्या प्रश्नांची अधिक सखोल उत्तरं देऊ शकेल.

Google Search आणि Workspace मध्ये बदल

Google Search आणि Workspace हे प्लॅटफॉर्म्सही नव्या AI फिचर्ससह अपडेट होण्याची शक्यता आहे. AI टूल्सच्या मदतीने सर्च अधिक स्मार्ट आणि वैयक्तिक बनणार असून, Workspace मध्ये वापरकर्त्यांचे काम सोपे करणारे नवीन ऑटोमेशन टूल्स जोडले जातील.

Android 16 चे अनावरण

Android 16 या नव्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या काही वैशिष्ट्यांची झलक यापूर्वीच मिळाली आहे, परंतु या कार्यक्रमात त्याचं अधिकृत सादरीकरण होण्याची शक्यता आहे. यामध्ये नवीन प्रायव्हसी सेटिंग्ज, इंटरफेस सुधारणा आणि स्मार्ट फीचर्स असतील.

AI टूल्सचे भविष्य

गूगल अशा AI टूल्सवर काम करत आहे जे स्वतःहून कोडिंग करू शकतील, माहिती शोधू शकतील आणि विश्लेषण करू शकतील. हे टूल्स भविष्यात अनेक व्यावसायिक क्षेत्रात क्रांती घडवू शकतात शिक्षण, आरोग्य, डेव्हलपमेंट, आणि ग्राहक सेवा यांसारख्या क्षेत्रात त्यांचा प्रभाव दिसेल.

नवीन XR हेडसेटची पहिली झलक

गूगल आणि Samsung एकत्र येऊन XR (Extended Reality) हेडसेट तयार करत आहेत. यामध्ये Gemini AI एकत्र करून स्मार्ट ग्लासेस आणि व्हर्च्युअल रिअॅलिटीचा अनुभव पूर्णपणे बदलण्याची तयारी आहे. या इव्हेंटमध्ये या प्रोजेक्टची पहिली झलक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Google I/O 2025 हे केवळ एक तांत्रिक इव्हेंट नसून, डिजिटल जगात होणाऱ्या क्रांतिकारी बदलांचं एक व्यासपीठ आहे. AI, Android, स्मार्ट डिव्हाइसेस आणि डेटा-ड्रिव्हन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गूगल आपली सेवा अधिक सुलभ, वेगवान आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT