Google Earthquake Alert Pudhari
तंत्रज्ञान

Earthquake Alert: भूकंप येण्यापूर्वीच Google ने पाठवला अलर्ट; वैज्ञानिकांनाही पडला प्रश्न; हे तंत्रज्ञान कसं काम करतं?

Google Earthquake Alert: व्हेनेझुएलातील भूकंपानंतर Google Earthquake Alert प्रणाली पुन्हा चर्चेत आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Google Earthquake Alert: व्हेनेझुएलामध्ये झालेल्या सलग दोन भूकंपांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. या नैसर्गिक आपत्तीनंतर सोशल मीडियावर एक वेगळीच चर्चा रंगली. अनेक अँड्रॉइड युजर्सनी दावा केला की, भूकंपाचे जोरदार धक्के बसण्यापूर्वीच त्यांच्या मोबाईलवर Google कडून इशारा (Earthquake Alert) देण्यात आला होता.

यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, भूकंपाची अचूक वेळ वैज्ञानिकांनाही सांगता येत नाही, मग Google ला आधीच याची माहिती कशी मिळाली?

स्मार्टफोनच सांगतो भूकंप कधी येणार?

आज जवळपास प्रत्येक अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये अॅक्सेलरोमीटर (Accelerometer) नावाचा सेन्सर असतो. हा सेन्सर सामान्यतः फोनची स्क्रीन फिरवणे किंवा हालचाल ओळखण्यासाठी वापरला जातो. मात्र, अतिशय सूक्ष्म हालचाल तो ओळखू शकतो. जेव्हा एखाद्या भागात अनेक स्मार्टफोन एकाच वेळी अशाच प्रकारची हालचाल करतात, तेव्हा ते संकेत Google च्या Android Earthquake Alerts System कडे पाठवले जातात.

दोन अब्जांहून अधिक फोनचं जागतिक नेटवर्क

Google कोणत्याही एका फोनच्या माहितीवर अवलंबून राहत नाही. एका भागातील अनेक अँड्रॉइड फोनमधून समान प्रकारच्या हालचाली नोंदवल्यास Google चे सर्व्हर त्याचे विश्लेषण करतात आणि तो भूकंप असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जगभरातील दोन अब्जांहून अधिक अँड्रॉइड स्मार्टफोन या प्रणालीचा भाग असल्याने हे जगातील सर्वात मोठ्या डिजिटल भूकंप निरीक्षण यंत्रणांपैकी एक मानले जाते.

भूकंप येण्यापूर्वी अलर्ट कसा मिळतो?

भूकंपाच्या वेळी दोन प्रकारच्या लहरी निर्माण होतात.

P-Waves (प्राथमिक लहरी) या सर्वात वेगवान असतात. त्या कमी नुकसान करतात, पण सर्वप्रथम पोहोचतात. स्मार्टफोनमधील सेन्सर या लहरी लगेच ओळखतात.

त्यानंतर S-Waves (दुय्यम लहरी) येतात. या तुलनेने संथ असल्या तरी सर्वाधिक नुकसान याच लहरींमुळे होते.

फोनने P-Waves त्याची माहिती इंटरनेटद्वारे क्षणार्धात Google च्या सर्व्हरपर्यंत पोहोचवतात. इंटरनेटचा वेग भूकंपाच्या लहरींपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्यामुळे S-Waves लोकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच Google काही सेकंदांचा इशारा पाठवतो.

Google चे दोन प्रकारचे अलर्ट

Google युजर्सना परिस्थितीनुसार दोन प्रकारचे अलर्ट पाठवतो.

  • Be Aware Alert – सौम्य भूकंपासाठी. यामध्ये सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

  • Take Action Alert – तीव्र भूकंपाचा धोका असल्यास. सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला आणि आवश्यक सूचना दिल्या जातात.

या अलर्टमध्ये भूकंपाची तीव्रता, केंद्रबिंदू आणि सुरक्षिततेसंबंधी माहितीही उपलब्ध असते.

भारतातही उपलब्ध आहे ही सुविधा

Google चे Android Earthquake Alerts System भारतात 2023 पासून उपलब्ध आहे. Android 5 किंवा त्यापुढील आवृत्ती असलेल्या फोनमध्ये ही सुविधा वापरता येते. मात्र, यासाठी मोबाईल डेटा किंवा Wi-Fi सुरू असणे आवश्यक आहे.

फोनमध्ये Earthquake Alert कसा सुरू कराल?

  1. मोबाईलच्या Settings मध्ये जा.

  2. Safety & Emergency किंवा Location विभाग उघडा. (काही फोनमध्ये हा पर्याय Privacy & Security मध्ये असतो.)

  3. Earthquake Alerts पर्याय निवडा.

  4. हा पर्याय बंद (Off) असल्यास तो On करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT