Gen Z CD Sales Surge pudhari
तंत्रज्ञान

Gen Z CD Sales Surge: जेन झीमध्ये अचानक वाढला CD खरेदीचा ट्रेंड.. तब्बल १६.३ मिलियन युनिट्स विकले; नेमकं कारण काय?

Anirudha Sankpal

Gen Z CD Sales Surge: वर्षाच्या मध्यावरच मनोरंजन आणि डेटा कंपनी Luminate ने दिलेल्या माहितीनुसार सीडी खरेदी पारंपरिक कॅसेटपेक्षा चांगलाच वाढला आहे. डीजिटलच्या युगात देखील CD खरेदीचा वाढता ट्रेंड पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ल्युमिनेटचे सीईओ रॉब जोनास यांनी सांगितलं की CD चा खप १६ टक्कांनी वाढला असून आतापर्यंत १६.३ मिलियन युनिट्स विकली गेली आहेत. त्याने २.४ टक्क्यांनी वाढणाऱ्या पारंपरिक कॅसेटला खूपच मागं टाकलं आहे.

लोकांनी दिली विविध कारणे

लोक सीडी खरेदीकडे कसे वळले याबाबत प्रत्येकाचे वेगवेगळे व्हर्जन आहे. ३१ वर्षाच्या मायकल स्वालबर्ग यांनी सांगितलं की डिजीटल युगात सीडी हे फक्त माझ्यासाठी मालकीहक्क नाही तर संभाषण करण्याची एक मुलभूत गरज आहे. ते म्हणाले की, मला सीडीची केस उघडायला, ते पातळ बुकलेट, तो केसमधील पेपरचा फील घ्यालला त्यावरील लिरिक्स वाचायला केसवरील ते आर्टिस्टिक फोटो पाहायला खूप आवडते. त्यामुळेच मी सीडी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

काहींसाठी सीडी प्लेअर आणि त्यातील सीडी या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा एक भाग आहे. काहींच्या मते तर कॅसेट आणि डिजीटल स्ट्रीमिंग या दोन्हीपेक्षा सीडीची आवाज चांगला असतो.

जेन झी CD कडे का वळले?

सीडी खरेदी करणाऱ्या काही ग्राहकांच्या मते ही एक गरज बनली आहे. एका रेड्डीट युजरने सांगितलं की शाळेने वायरलेस इअरबर्ड आणि फोनवर बंदी घातली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पालकांचा सीडी प्लेअर डेस्कमन कपाटातून बाहेर काढळा आहे.

BTS देखील जबाबदार

याला बीटीएस देखील जबाबदार आहे. द के पॉप मेगास्टार्सनी २०२६ मध्ये मल्टीपल सीडी एडिशन लाँच केल्या आहेत. त्यांनी Arirang अल्बमची सीडी लाँच केली आहे. त्याच्या फक्त अमेरिकेत जवळपास ६ लाख कॉपीज विकल्या गेल्या आहेत.

जरी आपण बीटीएस आणि इतर के पॉप ग्रुप्सच्या सीडी बाजूला ठेवल्या तरी जवळपास या वर्षाच्या पहिल्या टप्प्यात जवळपास सीडी खरेदीची वाढ ही ७ टक्के आहे. यातील जेन झी सीडी खरेदीचा ट्रेंड हा वाढत असून जेन झींचा सीडी खरेदीतील वाटा हा जवळपास ६० टक्के आहे. विशेष म्हणजे जेन झी हे आता जास्तीकरून १९९० आणि त्याच्या आधीचेही म्युझिक ऐकत आहेत. हे सर्व आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT