Google Gemini Gemini ai browsing assistant
गुगलचा लोकप्रिय क्रोम ब्राउझर लवकरच आपल्याला पूर्णपणे बदललेला दिसेल, कारण तो आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वैशिष्ट्यांसह अद्ययावत केला जात आहे. कंपनीने क्रोम ब्राउझरसाठी काही नवीन AI अपडेट्सची घोषणा केली आहे. या अपडेट्समुळे ब्राउझर अधिक सुरक्षित आणि उपयुक्त होईल, असा दावा कंपनी करत आहे. यामुळे येत्या काळात क्रोम ब्राउझर वापरण्याचा तुमचा अनुभव पूर्णपणे बदलेल आणि एआय सहाय्यक (AI assistant) तुमचे काम अधिक सोपे करेल. हे नवीन अपडेट्स टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील.
'Gemini' होईल तुमचा ब्राउझिंग असिस्टंट
Googleचा 'Gemini' एआय आता क्रोममध्ये एकत्रित केला जात आहे. हा तुमचा ब्राउझिंग असिस्टंट (Browsing Assistant) म्हणून काम करेल. तो तुमच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मदत करेल आणि मिळालेल्या माहितीचे स्पष्टीकरण देखील देईल. तुम्ही यापूर्वी कोणत्या वेबसाइट्स पाहिल्या आहेत, याचा मागोवा घेण्याचे कामही 'जेमिनी' एआय (Gemini AI) करेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, लवकरच तुम्ही जेव्हा क्रोम ब्राउझर वापराल, तेव्हा 'जेमिनी' एआयची भूमिका खूप महत्त्वाची असेल आणि तो तुम्हाला प्रत्येक क्षणी मदत करण्यास तयार असेल.
या नवीन वैशिष्ट्याची सुरुवात सर्वात आधी अमेरिकेतील युजर्संसाठी करण्यात आली आहे. मॅक (Mac) आणि विंडोज (Windows) युजर्स (users) सध्या त्याचा वापर करू शकतात. सध्या हे वैशिष्ट्य फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. लवकरच हे अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) वर उपलब्ध होईल, असे सांगितले जाते. त्यानंतर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्येही क्रोम ब्राउझर वापरताना 'जेमिनी' एआय (Gemini AI) मदत घेऊ शकाल. गुगलच्या इतर ॲप्स, जसे की गुगल डॉक्स (Google Docs) आणि कॅलेंडरमध्येही (Calendar) 'जेमिनी' एआयचा समावेश करण्याची तयारी सुरू आहे.
या व्यतिरिक्त, गुगल क्रोमचा अॅड्रेस बारही (address bar) अद्ययावत केला जात आहे. अॅड्रेसबार म्हणजे ती जागा जिथे तुम्ही यूआरएल (URL) टाइप किंवा पेस्ट करता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच अॅड्रेस बारमध्येही एआयचा समावेश होईल आणि युजर्स ऑनलाइन शॉपिंगमध्ये त्याची मदत घेऊ शकतील. उदाहरणार्थ, तुम्ही एखादे उत्पादन पाहत असाल तर अॅड्रेस बार तुम्हाला वॉरंटी पॉलिसीची (warranty policy) माहिती देऊ शकतो. विशेष म्हणजे, गुगल क्रोममधील एआयचा हा सहभाग फक्त इंग्रजी भाषेत मर्यादित राहणार नाही, तर लवकरच तो स्थानिक भाषांमध्येही उपलब्ध होईल. पण यासाठी कोणतीही निश्चित वेळमर्यादा (time-line) अद्याप समोर आलेली नाही. डेस्कटॉपनंतर मोबाइल डिव्हाइसवर क्रोममध्ये 'जेमिनी' एआय आणणे हे कंपनीचे प्राधान्य आहे.