iPhone Discount 2025 Canva
तंत्रज्ञान

iPhone Discount 2025| आयफोनच्या या मॉडेलवर तब्बल 20 हजारांची बचत; ऑफर फक्त मर्यादित काळासाठी, जाणून घ्या सविस्तर

iPhone Discount 2025 | फ्लिपकार्टवर आयफोनवर मेगा डिस्काउंट; तुमचं ड्रीम फोन घ्या आत्ताच

shreya kulkarni

iPhone Discount 2025

आयफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर आयोजित 'इंडिपेंडेंस डे सेल' मध्ये आयफोनच्या विविध मॉडेल्सवर मोठ्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तुमचा आवडता प्रीमियम स्मार्टफोन आता अधिक किफायतशीर किमतीत उपलब्ध झाला आहे. या सेलमध्ये iPhone 15 Plus, तसेच बहुप्रतिक्षित iPhone 16 Pro आणि 16 Pro Max मॉडेल्सवर आकर्षक ऑफर्स मिळत आहेत.

iPhone 15 Plus वर आकर्षक बचत

आयफोन 15 प्लस, ज्याची मूळ किंमत ₹८९,९०० आहे, तो या सेलमध्ये ११% सवलतीसह ₹७९,९९९ मध्ये उपलब्ध आहे. यावर क्रेडिट कार्डद्वारे अतिरिक्त ₹४,००० ची सूट मिळवण्याची संधी आहे. तसेच, ₹६,६६७ प्रति महिना याप्रमाणे सुलभ हप्त्यांचा (EMI) पर्याय देखील निवडता येईल.

  • प्रमुख वैशिष्ट्ये:

    • स्टोरेज: २५६ जीबी

    • डिस्प्ले: ६.७ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले

    • कॅमेरा: ४८MP + १२MP ड्युअल रियर कॅमेरा

    • प्रोसेसर: A16 बायोनिक चिपसह वेगवान कामगिरी

Apple iPhone 16 Pro: मोठी सवलत

iPhone 16 Pro वर १२% डिस्काउंट मिळत असून, त्याची किंमत ₹१,१९,९०० वरून ₹१,०४,९०० झाली आहे. या डीलमुळे तुमची थेट १५,००० रुपयांची बचत होईल. या मॉडेलसाठी ₹८,७४२ प्रति महिना याप्रमाणे ईएमआयची सोय आहे.

  • प्रमुख वैशिष्ट्ये:

    • रॅम/स्टोरेज: ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज

    • डिस्प्ले: ६.३ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले

    • कॅमेरा: ४८MP + ४८MP + १२MP ट्रिपल कॅमेरा सेटअप

    • प्रोसेसर: नवीन A18 प्रो चिपचा वापर

Apple iPhone 16 Pro Max वर सर्वाधिक सूट

सर्वात मोठी सवलत iPhone 16 Pro Max वर मिळत आहे. ₹१,४४,९०० किमतीचा हा फोन १३% डिस्काउंटसह ₹१,२४,९०० मध्ये खरेदी करता येईल. म्हणजेच, यावर तुम्हाला २०,००० रुपयांपर्यंतची बचत करता येणार आहे.

  • प्रमुख वैशिष्ट्ये:

    • रॅम/स्टोरेज: ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज

    • डिस्प्ले: ६.९ इंचाचा भव्य सुपर रेटिना डिस्प्ले

    • कॅमेरा: ४८MP + ४८MP + १२MP प्रोफेशनल रियर कॅमेरा

    • प्रोसेसर: A18 प्रो चिप

थोडक्यात सांगायचे झाल्यास, प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करू करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या ऑफर्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी, फ्लिपकार्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT