एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने भारतातील इंटरनेट क्रांतीला चालना देण्याची तयारी सुरू केली आहे. भारतात ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये जलद इंटरनेट पोहोचवण्याच्या उद्देशाने, कंपनी केवळ 840 रुपये मासिक दरात अनलिमिटेड डेटा देणारी सेवा सुरू करू शकते, असा अंदाज आहे. मात्र, या सेवेसाठी लागणारे हार्डवेअर म्हणजे ‘स्टारलिंक डिश किट’ सुमारे ₹21,000 ते ₹32,000 दरम्यान असण्याची शक्यता आहे.
सध्या भारतात Airtel, Jio, Vi आणि BSNL यांसारख्या पारंपरिक टेलिकॉम कंपन्या शहरांमध्ये जलद इंटरनेट सेवा देतात. मात्र ग्रामीण भागात इंटरनेट अजूनही मोठं आव्हान आहे. याच ठिकाणी Starlink आपली सेवा सुरू करून लाखो लोकांपर्यंत जलद इंटरनेट पोहोचवू शकते. कंपनीचे उद्दिष्ट पहिल्या टप्प्यात एक कोटी ग्राहक जोडण्याचे असून, त्यासाठी Starlink ने भारत सरकारकडून प्राथमिक मंजुरी (Letter of Intent) मिळवलेली आहे.
अंतिम परवानगी मिळाल्यानंतर सेवा सुरू होणार आहे. स्टारलिंकची ही सेवा देशाच्या डिजिटल युगात एक मोठा टप्पा ठरू शकते. या माध्यमातून कंपनीचे लक्ष विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात इंटरनेट पोहोचवण्यावर आहे, जिथे अद्यापही स्थिर नेटवर्कचा अभाव आहे.
स्टारलिंकचे उद्दिष्ट पहिल्या टप्प्यात 1 कोटी ग्राहक जोडण्याचे आहे. मात्र, सेवेसाठी लागणारे हार्डवेअर (सॅटेलाइट डिश किट) सुमारे ₹21,000 ते ₹32,000 दरम्यान असेल. ही किंमत सामान्य ग्राहकांसाठी अडचणीची ठरू शकते. भारतात अनेक ब्रॉडबँड कंपन्या कमी किंमतीत अधिक स्पीड आणि OTT फायदे देत असल्यामुळे स्पर्धा मोठी होण्याची शक्यता आहे.
सध्या भारत सरकारच्या टेलिकॉम विभागाकडून Starlink ला Letter of Intent (LOI) मिळाला असून अंतिम परवानगी मिळाल्यावर सेवा सुरू होईल. याआधी Eutelsat-OneWeb आणि Jio-SES ला आधीच परवानगी मिळाली आहे. Starlink सेवा सुरू झाल्यास Airtel, Jio, Vi आणि BSNL या पारंपरिक टेलिकॉम कंपन्यांसाठी तीव्र स्पर्धा निर्माण होऊ शकते.