ChatGPT history delete 
तंत्रज्ञान

ChatGPT history delete: तुमचं ChatGPT चॅट कायमचं कसं डिलीट कराल? जाणून घ्या सर्वात सोपी ट्रिक

तुमचा वैयक्तिक डेटा ChatGPT आणि Gemini सारख्या टूल्सकडे किती सुरक्षित आहे, याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. दरम्यान तुम्ही सर्च केलेला डेटा असा करा डिलीट

पुढारी वृत्तसेवा

WhatsApp प्रमाणेच, आता लोक ChatGPT ची चॅट हिस्ट्री कशी डिलीट करावी हे इंटरनेटवर शोधत आहेत. ChatGPT आणि Google Gemini सारखी AI साधने आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहेत. अनेक लोक आता गुगल (Google) सर्चऐवजी AI टूल्सचा वापर करत आहेत आणि अनेकदा असे प्रश्न विचारत आहेत जे ते सहसा गुगलवर विचारत नाहीत.

एखादा प्रश्न विचारणे म्हणजे तुम्ही तुमची काही वैयक्तिक माहिती त्या AI टूलला देत आहात. तुमचा वैयक्तिक डेटा ChatGPT आणि Gemini सारख्या टूल्सकडे किती सुरक्षित आहे, याबद्दल चर्चा सुरूच राहील. पण सध्या आपण ChatGPTवरील चॅट हिस्ट्री (History) आणि डेटा (Deta) कसा हटवायचा हे जाणून घेऊया. डेटा सर्व्हरवरून कसा डिलीट करायचा हे आपण नंतर पाहू.

चॅट हिस्ट्री (Chat History) कशी डिलीट करावी?

जेव्हा तुम्ही कोणत्याही AI टूलसोबत संभाषण सुरू करता, तेव्हा त्याचा एक लॉग तयार होतो, जो सहसा डाव्या बाजूला दिसतो. ChatGPT, Gemini आणि Grok सारख्या टूल्समध्ये लॉगिन केल्यानंतर, होम पेज उघडते आणि डाव्या बाजूला एक पॅनल दिसते, जिथे तुमच्या संभाषणांचा इतिहास असतो. ही संभाषणाची हिस्ट्री डिलीट करण्यासाठी, तुम्हाला तीन डॉटवर क्लिक करावे लागेल. तिथे तुम्हाला Rename आणि Delete असे पर्याय दिसतील, जिथून तुम्ही हिस्ट्री हटवू शकता.

ChatGPT वरून हिस्ट्री कशी डिलीट करावी:

  • स्मार्टफोनवर:

  1. तुमच्या स्मार्टफोनवर ChatGPT ॲप उघडा आणि मेनू आयकॉनवर टॅप करा.

  2. सर्वात खाली तुम्हाला तुमचा प्रोफाइल आयकॉन (तुमचे नाव) दिसेल, त्यावर टॅप करा.

  3. एक लिस्ट उघडेल, जिथे तुम्हाला Data Controls दिसेल. या मेनूमध्ये जाऊन तुम्ही Clear Chat History हा पर्याय निवडू शकता.

  • वेबसाइटवर:

  1. ChatGPT च्या वेबसाइटवर लॉगिन करा.

  2. Settings मध्ये जा.

  3. Data Controls शोधा. येथे तुम्हाला Delete All Chats चा पर्याय दिसेल. तो निवडल्यानंतर, तुम्ही ChatGPT वरून तुमची संपूर्ण चॅट हिस्ट्री डिलीट करू शकता.

चॅट एक्सपोर्ट (Export) कसे करावे?

ChatGPT तुम्हाला तुमच्या चॅट्सची माहिती एक्सपोर्ट करण्याचा पर्याय देखील देते. Data Controls पर्यायामध्येच तुम्हाला इतरही अनेक पर्याय दिसतील. तिथे तुम्हाला सर्वात खाली Export Data चा पर्याय मिळेल. Export Data कन्फर्म केल्यावर, तुमची संपूर्ण ChatGPT हिस्ट्री तुमच्या ईमेल आयडीवर पाठवली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT